JOIN US
मराठी बातम्या / Viral / Gautami Patil : एक कार्यक्रम रद्द, दुसरा टोटल हाऊसफुल्ल; पंढरपूरात गौतमीला पाहण्यासाठी तरुणांसह म्हाताऱ्यांचाही राडा

Gautami Patil : एक कार्यक्रम रद्द, दुसरा टोटल हाऊसफुल्ल; पंढरपूरात गौतमीला पाहण्यासाठी तरुणांसह म्हाताऱ्यांचाही राडा

सोलापूरातील आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मोठी गर्दी पाहायला मिळाली. गौतमीला पाहण्यासाठी तुफान गर्दी आणि चाहत्यांचा गोंधळ पाहायला मिळाला

जाहिरात

गौतमी पाटील

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 डिसेंबर :  टिक टॉक स्टार गौतमी पाटील तिच्या डान्समुळे ओळखली जाते. मागच्या वर्षभरात गौतमी पाटील हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. गौतमी पाटील ही लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर टीका करण्यात आली. गौतमी पाटीलच्या लावणीवरून निर्माण झालेल्या वादानंतर गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमांवार कायमस्वरुपी बंदी आणण्याची मागणी करण्यात आली. अशातच पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मोठी गर्दी पाहायला मिळाली. गौतमीला पाहण्यासाठी तुफान गर्दी आणि चाहत्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रचंड मागणी आहे. यावेस पंढरपुरातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे एका वाढदिवसाच्या पार्टीला गौतमी पाटीलच्या डान्स आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गौतमीला पाहण्यासाठी तरुणांपासून वयोवृद्धांनी गर्दी केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि बॅरिगेट्स लावण्यात आले होते मात्र गौतमीला पाहण्यासाठी चाहते बभान झाले होते. अनेक जण बॅरिगेट तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. हेही वाचा - Gautami Patilचा लावणी कार्यक्रम पहिल्यांदा रद्द; का? कुठे? समोर आली माहिती

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे.छोट्या गावातही गौतमी पाटीलच्या डान्सची क्रेझ पाहायला मिळते. हजारोंच्या संस्खेने प्रेक्षक गौतमीच्या कार्यक्रमाला आले होते. तरुण बेभान होऊन नाचत होते. गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. गौतमी पाटीलच्या पुढच्या 2 महिन्यांचे कार्यक्रम फिक्स असतात. कार्यक्रमावर बंदी आणण्याच्या मागणीनंतर पहिल्यांदा गौतमीचा इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे कार्यक्रम रद्द करण्यात आला.

गौतमीच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी पाहता आणि आधीच्या कार्यक्रमात झालेले राडे पाहता सुरक्षेच्या दृष्टीने गावकऱ्यांनी कार्यक्रमासाठी जागा देण्यासाठी नकार दिल्यानं कार्यक्रम रद्द करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या