JOIN US
मराठी बातम्या / Viral / रीलसाठी जीवाशी खेळ! वेगाने येत होती ट्रेन अन् ट्रॅकवर झोपली व्यक्ती, पुढे घडलं असं काही.....

रीलसाठी जीवाशी खेळ! वेगाने येत होती ट्रेन अन् ट्रॅकवर झोपली व्यक्ती, पुढे घडलं असं काही.....

सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. लोक प्रसिद्धी झोतात येण्यासाठी अनेक गोष्टी करत आहेत. काही जण तर प्रसिद्धी झोतात येण्सासाठी आपला जीवदेखील धोक्यात घालत आहेत.

जाहिरात

रीलसाठी जीवाशी खेळ!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 जुलै : सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. लोक प्रसिद्धी झोतात येण्यासाठी अनेक गोष्टी करत आहेत. काही जण तर प्रसिद्धी झोतात येण्सासाठी आपला जीवदेखील धोक्यात घालत आहेत. असे धोकादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायेत. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडलीये. एक व्यक्ती ट्रेनसमोर धोकादायक स्टंट करताना दिसून आला. सोशल मीडियावर लोक वेगवेगळे रील बनवून शेअर करत असतात. यामध्ये निरनिराळे व्हिडीओ पहायला मिळतात. नुकताच समोर आलेला व्हिडीओ धोकादायक आहे. व्यक्तीनं चक्क रेल्वे ट्र्रॅकवर झोपून व्हिडीओ बनवलाय. हा धोकादायक प्रकाराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रील बनवण्यासाठी जीव धोक्यात घालताना दिसत आहे. एक व्यक्ती पुलावर रील बनवत आहे. रेल्वे ट्रॅकवर पडून आपले दोन्ही हात डोक्याखाली ठेवले आणि त्यानंतरच ट्रेन तिथून भरधाव वेगाने जाताना दिसली. हा व्यक्ती जीव मुठीत ठेवून रील बनवत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. फक्त प्रसिद्धीसाठी रिल बनवून स्वतःचा जीव धोक्यात घालणं खूपच भयानक आहे.

संबंधित बातम्या

@ajaychauhan41 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 11 सेकंदांचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. लोक अशा कृतीवर संताप व्यक्त करत आहे. अनेकजण बोलत आहे की अशा लोकांवर कडक कारवाई व्हायरल पाहिजे. लोक अनेक कमेंट करत आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे अद्याप समोर आलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर लोक रील बनवताना काहीही करतात. यामुळे स्वतःला किंवा समोरच्या व्यक्तीला आपला त्रास होतोय याचं भानही अनेकांना नसतं. असे अनेक व्हिडीओ आत्तापर्यंत व्हायरल झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या