नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तर इतके मजेशीर असतात की ते पाहिल्यावर आपल्याला हासू आवरत नाही. बऱ्याचदा लग्न, साखरपुडा, वाढदिवस अशा अनेक समारंभातलेही काही व्हिडीओ खूप चर्चेत येतात. काही जणांना अशा समारंभांमध्ये व्हिडीओ व फोटो काढायची प्रचंड आवड असते. पण, काही वेळा असे व्हिडीओ काढतानाही फजिती होऊ शकते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पार्टीमधील व्हिडीओ हा व्हिडीओ एका यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की एक पार्टी सुरू आहे आणि ही पार्टी एका लहान मुलाच्या वाढदिवसाची आहे. कारण बरेच लोक मुलाभोवती उभे आहेत आणि त्याच्यावर नोटांचा वर्षाव करत आहेत. मुलगा पण एका प्ले कारमधून येताना दिसत आहे. अशातच या सर्वांसमोर उभ्या असलेल्या एका महिलेला आपला मोबाईल काढून व्हिडीओ तयार करायचा असतो. मग ती महिला फोन घेत व्हिडीओ बनवण्यास सुरुवात करते आणि हळूहळू मागे सरकत जाते. तो लहान मुलगा आणि त्याच्यावर पैसे उडवणारे येत असताना ही महिला समोरून व्हिडीओ काढत मागे सरकत जाते. पण मागे काय आहे? याकडे तिचं लक्ष नसतं. ती तिच्याच धुंदीत व्हिडीओ काढण्यात मग्न असते. व्हिडीओ काढत ती मागे सरकत असते. अशातच ती मागे असलेल्या फायर लॅम्पवरला धडकते. तिला कळतच नाही की नक्की काय झालंय, यातच तिचा तोल जातो.
फायर लॅम्पला महिलेची धडक बसताच तो खाली पडतो आणि मग ती महिला पडते. समोरचे लोक त्यांच्याच धुंदीत डान्स करत नोटा उडवत असतात. तर, ती महिला स्टेजच्या काठावर पडते. सुदैवाने महिलेच्या मागे उभ्या असलेले काही लोक तिला पडताना पाहतात आणि लगेच तिला उचलतात, असं या व्हिडीओत दिसत आहे. सध्या हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर कमेंटचा पाऊस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींच्या मते ती महिला मागे सरकत असताना तिचं लक्ष नव्हतं तर कुणीतरी तिला आधीच जाऊन सांगायला पाहिजे होतं, जेणेकरून ती पडली नसती. तर, काही जण यावर हसणाऱ्या इमोजीही कमेंट करत आहेत.