माकडाची मजेशीर रिअॅक्शन
नवी दिल्ली 19 मे : माकडांच्या जवळजवळ सर्व प्रजातींना फळं आणि भाज्या खायला आवडतात. याशिवाय माकडांना फळांमध्ये केळी खायला जास्त आवडते असंही मानलं जातं. कोणत्याही व्यक्तीने दिलेलं अन्न ते लगेच हिसकावून घेतात. पण, आता आम्ही एक असा व्हिडिओ आणला आहे, जो तुमचा हा समज बदलू शकतो. केळी पाहिल्यावर या व्हिडिओमधील माकडाने दिलेले एक्सप्रेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आधी मान पकडली नंतर पाठीवर बसला, महाकाय अजगरासोबत खेळताना चिमुकल्याचा Video व्हिडिओमध्ये एक माकड टेरेसच्या काठावर बसलेलं दिसत आहे. दरम्यान कोणीतरी त्याला सोललेली केळी देतं. केळी अर्धी खाल्ली होती. पण, यात सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे माकडाची राग व्यक्त करण्याची पद्धत. जेव्हा ही व्यक्ती केळी देऊ लागते तेव्हा माकड आपले डोळे त्या व्यक्तीकडे फिरवतं आणि रागात पाहतं. माकड त्या व्यक्तीकडे संशयाने पाहत असल्याचं दिसतं. काही सेकंदांनंतर, माकड अर्ध खाल्लेल्या केळ्याकडे पाहतं आणि पुन्हा त्याच संशयास्पद नजरेने त्या माणसाकडे पाहतं, जणू त्याने काही मोठा गुन्हा केला आहे.
त्याचे हे हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मॅटिस यांनी ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, माकडाचे मजेशीर हावभाव पाहून लोकांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींना हा व्हिडिओ खूपच मजेदार वाटला, तर काहींनी माकडाची अशी मस्करी करू नये, अन्यथा हल्ला होऊ शकतो, असा सल्ला दिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिलं की, “माकडांना केळी आवडतात आणि जर कोणी त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थाबाबत त्यांची चेष्टा केली तर तेही मस्ती करण्यात मागे हटणार नाहीत.” आणखी एका युजरने लिहिलं, “माकड मनात विचार करत असेल की मी केळी डझनमध्ये खायचो आणि तू फक्त एक साल देत आहेस. निघ इथून.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं, “तुम्ही अर्धी केळी दिलीत! तुम्ही माझी मस्करी करत आहात.” चौथ्याने लिहिलं, “केळी कोणीतरी आधीच खाल्ल्यामुळे तो रागावला आहे.”