JOIN US
मराठी बातम्या / Viral / इतका कसला राग? मंडपातच नवरीचं नवरदेवासोबत विचित्र कृत्य, हैराण करणारा VIDEO व्हायरल

इतका कसला राग? मंडपातच नवरीचं नवरदेवासोबत विचित्र कृत्य, हैराण करणारा VIDEO व्हायरल

नवरी-नवरदेवाचा हा व्हिडिओ (Bride and Groom Video) पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओवर नेटकरी निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 12 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) लग्नसमारंभातील (Wedding Videos) अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. यातील अनेक व्हिडिओ असे असतात जे पाहून नेटकरीही हैराण होतात. काही व्हिडिओ (Funny Video) इतके मजेशीर असतात की पोट धरून हसायला भाग पाडतात. असे व्हिडिओ नेटकऱ्यांच्याही भलतेच पसंतीस उतरतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवरी-नवरदेवाचा हा व्हिडिओ (Bride and Groom Video) पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओवर नेटकरी निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. अजब! कधीही भेट न झालेल्या कैद्याच्या प्रेमात पडली तरुणी; तुरुंगातच करणार लग्न सध्या लग्नांचा सीझनच सुरू आहे. यादरम्यान लग्नातील कॅमेऱ्यात कैद झालेल्या विनोदी किंवा विचित्र घटना बऱ्याचदा सोशल मीडियावर अपलोड केल्या जातात. सध्या लग्नातील वरमाळा घालतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यादरम्यान नवरीनं असं काही केलं की हा चर्चेचा विषय ठरला.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की स्टेजवर वरमाळा घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र, नवरीबाई नाराज दिसत आहे. नवरी आणि नवरदेवाचे नातेवाईकही आजूबाजूलाच उपस्थित आहेत. मात्र, नवरी भरपूर नाराज दिसत आहे. नवरदेवाला वरमाळा घालताना नवरी ती दुरूनच फेकते. वरमाळा घालतानाही तिच्या चेहऱ्यावर राग दिसत आहे. रागात तिनं हेदेखील पाहिलं नाही की ही वरमाळा नवरदेवाच्या गळ्यातही व्यवस्थित पडली नाही. …आणि त्या गावात जिवंत माणसाची निघाली अंत्ययात्रा, धक्कादायक VIDEO हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रानं शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 40 लाखाहून अधिकांनी पाहिली आहे. यावर येणाऱ्या प्रतिक्रियाही अतिशय मजेशीर आहेत. काही लोकांचा असा अंदाज आहे, की नवरीला हे लग्न करायचं नाहीये आणि तिला दुसरंच कोणीतरी आवडत असावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या