JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: विशालकाय अजगराच्या पाठीवर बसून बेडकाची ऐटीत सवारी; थाट पाहून घालाल तोंडात बोटं

VIDEO: विशालकाय अजगराच्या पाठीवर बसून बेडकाची ऐटीत सवारी; थाट पाहून घालाल तोंडात बोटं

सध्या अजगराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Frog and Python Videos) होत आहे. यात एक बेडूक अजगराची सवारी करताना दिसतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 04 जानेवारी : जगभरात सापांच्या 2 हजारहून अधिक प्रजाती आहेत. यातील काहीच साप विषारी असतात. बाकीचे साप एकतर अजिबातही विषारी नसतात किंवा काही साप निमविषारी असतात. अजगरही त्याच सापांमध्ये आहे, जे विषारी नसतात. मात्र हे साप अतिशय विशालकाय असतात. यामुळे हे साप कोणत्याही बलाढ्य प्राण्याचीही शिकार करतात. सापांचे व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत (Viral Video of Python) राहतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. जन्मापासूनच एकदाही हसली नाही ही 24 वर्षीय तरुणी; कारण जाणून व्हाल शॉक विशेषतः अजगर मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करून त्यांना गिळतानाचे तर अनेक व्हिडिओ यात पाहायला मिळतात. सध्या अजगराचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Frog and Python Videos) होत आहे. मात्र, यात अजगर कोणत्या प्राण्याला गिळताना दिसत नाही, तर हा अतिशय मजेशीर व्हिडिओ आहे. यात एक बेडूल अजगराची सवारी करताना दिसतो.

संबंधित बातम्या

अजगराला पाहून मोठमोठे प्राणीही धूम ठोकतात, अशात इवल्याशा बेडकाला अजगरावर बसून सवारी करताना पाहून कोणीही हैराण होईल. आपल्या पाठीवर बेडूक बसल्याची जराही चाहूल अजगराला लागली असती तर बेडकाचं वाचणं अशक्यच होतं. बेडकाला आपला जीव गमावून या सवारीची किंमत चुकवावी लागली असती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक भलामोठा अजगर झाडींमधून सरपटत चालल्याचं दिसतं. या अजगराच्या पाठीवर एक बेडूक बसलेलं आहे आणि सवारीची मजा घेत आहे. कदाचित या बेडकाला याची कल्पनाही नाही की ज्याच्या पाठीवर तो बसला आहे तो अजगर क्षणात त्याचं जीवन संपवू शकतो. कारण अजगरापुढे हरण आणि बकरीसारखे मोठे प्राणीही हार मानतात. अस्वलाची शिकार करायला गेला वाघ; विचारही केला नसेल असा झाला शेवट; पाहा VIDEO हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर fnybitch नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 17 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी लाईक केला आहे. अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, ही बेडकाची शेवटची सवारी असेल. तर आणखी एकाने लिहिलं, लढाईत सापाची सवारी करताना बेडूक.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या