JOIN US
मराठी बातम्या / Viral / सोफ्यावर बसून गप्पा मारत होत्या दोघी; अचानकच साप आला अन्..., घटनेचा VIDEO VIRAL

सोफ्यावर बसून गप्पा मारत होत्या दोघी; अचानकच साप आला अन्..., घटनेचा VIDEO VIRAL

या व्हिडिओमध्ये दोन मुली सोफ्यावर बसलेल्या दिसतात. दोघीही आपल्या फोनमध्ये काहीतरी बघण्यात मग्न आहेत. मध्ये मध्ये त्या एकमेकींसोबत गप्पाही मारत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 12 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सापांचे व्हिडिओ (Snake Video) प्रचंड व्हायरल (Video Viral) होतात. सापाचं नाव ऐकलं तरी काही जणांच्या अंगावर काटा येतो तर काही लोक सापांसोबतच मैत्री करून त्यांच्यासोबत खेळताना दिसतात. मात्र, विचार करा की तुम्ही अगदी आरामात आपल्याच नादात बसला आहात आणि अचानक तुमच्याजवळ साप आला तर? सहाजिकच कोणीही व्यक्ती पुरती घाबरून जाईल. सध्या अशाच दोन तरुणींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बापरे, झोपलेल्या मुलीच्या गळ्यात नागाने विळखा घातला, 2 तास रंगला थरार VIDEO सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ (Instagram Video) चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुली सोफ्यावर बसलेल्या दिसतात. दोघीही आपल्या फोनमध्ये काहीतरी बघण्यात मग्न आहेत. मध्ये मध्ये त्या एकमेकींसोबत गप्पाही मारत आहेत. दोघीही इतक्यात मग्न आहेत, की आपल्या जवळ एक साप आल्याचंही त्यांना जाणवलं नाही. गप्पांच्या नादात त्यांना हेदेखील समजत नाही की एक साप सोफ्यावर आला आहे.

संबंधित बातम्या

बिअर मिळाली पण नोकरी गेली; दारूच्या नशेत नग्न होऊन सुपरमार्केटमध्ये पोहोचला अचानक काहीतरी धाडकन सोफ्यावर पडल्याचा आवाज होतो. यानंतर दोघींना समजतं की सोफ्यावर काहीतरी आहे. यातील एक मुलगी सापाला न पाहताच मोठमोठ्यानं ओरडू लागते. तर, दुसरीनं सापाला पाहताच तिथून पळ काढला. मात्र, हा साप खोटा असल्याचं शेवटी जाणवतं. कोणीतरी या दोघींना मुद्दाम भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या