जिल्हाधिकाऱ्यांनी केले सन्मानित -
मोहित राठौर, प्रतिनिधी शाजापूर, 29 मे : तुमचं काम छोटं असलं तरी तुमच्यात जर दानशूरपणाची भावना असेल तर तुमची वेगळी ओळख निर्माण होते. असाच एक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील शाजापूरबद्दल एका ऑटो रिक्षा चालकाचे जिल्हाधिकारी किशोर कुमार कन्याल यांच्याकडून कौतुक झाले आहेत. तसेच जिल्हाधिकार्यांनी उपस्थित लोकांकडून रिक्षा चालकाचे कौतुकही केले. तुम्ही विचार करत असाल की रिक्षा चालकाने असे काय काम केले की जिल्हाधिकारी देखील प्रभावित झाले, तर आम्ही तुम्हाला सांगतो की रिक्षाचालक दिलीप परमार यांनी रात्रीच्या वेळी गर्भवती महिलांसाठी एक अनोखी सेवा सुरू केली आहे. यासाठी दिलीपचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रिक्षाचालक दिलीप परमार हे रात्रीच्या वेळी गर्भवती महिलांना हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्रात मोफत घेऊन जातात. यासाठी देखील कोणतेही शुल्क आकारले जात नाही. गेली अनेक वर्षे दिलीप परमार हे माणुसकीच्या नात्याने गर्भवती महिलांना ही सुविधा मोफत देत आहेत. यासाठी दिलीप परमार यांनी त्यांच्या ऑटोरिक्षाच्या मागे गर्भवती महिलांसाठी ही सुविधा लिहून ठेवली आहे. आजच्या व्यावसायिक युगातही दिलीप सारखी माणसे आपल्या कार्यात आपल्या कुवतीनुसार योगदान देऊन मानवसेवेचे अनोखे उदाहरण बनले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी केले सन्मानित - शाजापूरचे जिल्हाधिकारी किशोर कन्याल हे गेल्या काही दिवसांत शहराच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांना दिलीप यांचा ऑटो दिसला, त्यावर लिहिले होते, “डिलिव्हरीसाठी रात्रीची सेवा मोफत”. त्यामुळे सोबतच्या प्रतिनिधींनी दिलीपबाबत सांगितल्यावर ते थांबले. जिल्हाधिकारी नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत दिलीप यांच्या घरी पोहोचले आणि त्यांचा सत्कार केला, 10 वर्षांपासून देताय अनोखी सेवा - रिक्षाचालक दिलीप परमार यांनी सांगितले की, गेली 10 वर्षे ते गर्भवती महिलांना रात्रीच्या वेळी मोफत रुग्णालयात नेण्याचे काम करत आहेत. यासाठी त्यांनी रिक्षावर त्यांचा मोबाईल क्रमांकही दाखवला आहे, जेणेकरून गरजेच्या वेळी त्यांना फोन करून बोलावता येईल. दिलीप सांगतात की, दिवसभरात वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असतात. परंतु लहान शहरांमध्ये गर्भवती महिलांना रात्रीच्या वेळी रुग्णालयात पोहोचण्याचे साधन मिळत नाही आणि ज्यांना ते मिळते त्यांच्याकडूनही महागडे भाडे आकारले जाते. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना रुग्णालयात नेऊन आपण आपल्या कार्यातून सामाजिक योगदान देऊ शकतो, असा विचार त्यांनी केला. असे केल्याने आनंद मिळतो आणि आपल्या कामातून मानवतेची सेवा करण्याची संधीही मिळते, असे दिलीप सांगतात. त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.