कोटा, 31 मे : उन्हाळा संपून थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होईल. बऱ्याच ठिकाणी वातावरणात बदल जाणवू लागला आहे व पाऊस पडू लागला आहे. पहिला पाऊस आला की सापासारखे सरपटणारे प्राणी कोरड्या जागा शोधू लागतात. यामुळे ते घरातही शिरतात. राजस्थान येथील कोटामधून असाच एक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी घरात साफसफाई करताना काळा किंग कोब्रा दिसला. यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. कोटामधील गणेशनगर भागात 4 फूट लांब काळा किंग कोब्रा घरात घुसला आणि तिथे जाऊन खोलीतील डबल बेडवर मस्ती करत बसला. त्या सापाला पाहून घरातील सर्व लोक घाबरले व घराबाहेर पडले. सुमारे 1 तास ते घाबरून घराबाहेर बसले आणि नंतर त्यांनी सर्पमित्राला बोलावलं. त्याने 4 फूट लांब काळ्या किंग कोब्राची सुटका करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर त्या कोब्राला जंगलात सोडण्यात आलं. सर्प मित्राने सांगितलं की, गणेशनगर भागात राहणारे रामप्रसाद मेहरा यांच्या घरात किंग कोब्रा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याने तिथे जाऊन पाहिलं असता घरातील सदस्य घराबाहेर बसले होते आणि खोलीला बाहेरून कुलूप लावले होते. खोली आणि स्वयंपाकघरात कोब्राचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यानंतर शोध घेतला व खोलीत ठेवलेला डबल बेड उचलत असताना त्याखाली एक काळा किंग कोब्रा दिसला. बेड बाहेर काढल्याबरोबर कोब्रा फणा काढून बेडवर बसला. यानंतर सर्पमित्राने त्याला पकडलं व नैसर्गिक अधिवासात सोडलं. 14 वर्षात 2500 विषारी सापांची सुटका करणारा ‘स्नेक मॅन’ रामप्रसाद मेहरा यांनी सांगितलं की, ते घरी पत्नी आणि मुलासह राहतात. त्यांची पत्नी खोली साफ करत होती. या वेळी स्टूलखाली काळा साप दिसला. सापाला पाहून ती घाबरली व तिने बाहेर पडत दाराला कुलूप लावलं. त्यानंतर सर्पमित्राला बोलावण्यात आलं आणि त्याने साप पकडला. दरम्यान, सध्या बदलत्या वातावरणामुळे अंधारात विशेष काळजी घेण्याची गरज असते. साप किंवा इतर प्राणी अशा वातावरणात बाहेर पडतात, त्यामुळे दुर्घटना घडू शकतात. म्हणून घराची साफसफाई करतानाही महिलांनी खबरदारी घ्यायला हवी.