जिममधील धक्कादायक व्हिडीओ
मुंबई 21 जुलै : आज काल तरुणाईला जीममध्ये जाण्याचं वेड लागलं आहे. अनेक लोक फिटनेस फ्रिक होऊन जीम लावतात. तर काही लोक रिल्स बनवण्यासाठी आणि खूप कूल वाटावं म्हणून जीमला जात असतात. तर काही लोकांना आपण किती वजन उचलू शकतो, तसेच आपण जगावेगळं काहीतरी करु शकतो असं दाखवायचं असतं. त्यामुळे ते धोका पत्करायला तयार असतात. असंच एका तरुणाने करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यासोबत जे घडलं ते तुम्हाला पाहावणार देखील नाही. या तरुणाने जीममध्ये मुर्खपणा केला. जो त्याला भोवला आणि त्यामुळे तो गंभीर जखमी देखील झाला आहे. वास्तविक, व्हिडीओमध्ये, व्यक्ती आवश्यकतेपेक्षा जास्त वजन उचलताना दिसत आहे, तेही फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी. व्यक्तीच्या खांद्यावर आधीच वजन असताना, ती व्यक्ती आणखी एक वजन उचलण्याचा प्रयत्न करते. असं करत असताना त्याचा तोल जातो ज्यामुळे त्याच्या खांद्यावर असलेले वजन एकाबाजूला झुकते ज्यामुळे तरुण थेट मागे पडतो. हा व्हिडीओ पाहून असे वाटते की, तो व्यक्ती थेट जीम इक्विपमेंटवर पडल्याने गंभीर जखमी झाला असावा. तसेच त्याच्या पाठीला देखील दुखापत झाली असावी. हा व्हिडीओ इथेच थांबला आहे. पण व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाजा लावू शकता की त्या व्यक्तीसोबत काय घडलं असेल.
या व्यक्तीला फक्त सोशल मीडियावर फुशारकी मारायची होती म्हणून त्याने क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलण्याचे धाडस केले. जिममध्ये असे धोकादायक कृत्य करण्याचा प्रयत्न करणारी ही पहिलीच व्यक्ती नाही, याआधीही अनेक जण व्हिडीओ आणि रील्स बनवताना अशा प्रकारच्या अडचणीत सापडले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सही थक्क झाले आहेत. तुम्ही देखील फक्त रिल्स बनवण्यासाठी धोकादायक प्रकार करत असाल तर आत्ताच थांबा. तसेच तुमचा कोणी मित्र असा प्रकार करत असेल तर त्याला देखील सावध करा.