JOIN US
मराठी बातम्या / Viral / रस्ता ओलांडताना भिंतीवर घातली कार, अपघातानंतर महिलेनं ठोकली धूम, Video व्हायरल

रस्ता ओलांडताना भिंतीवर घातली कार, अपघातानंतर महिलेनं ठोकली धूम, Video व्हायरल

अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दिवसाला जगभरात अनेक अपघात घडत असतात. यामध्ये काहीजण थोडक्यात बचावतात तर काही गंभीर जखमी होतात.

जाहिरात

अपघातानंतर महिला ड्रायव्हर गेली पळून

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 एप्रिल : अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दिवसाला जगभरात अनेक अपघात घडत असतात. यामध्ये काहीजण थोडक्यात बचावतात तर काही गंभीर जखमी होतात. मात्र काहींना आपला जीवदेखील गमवावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना किंवा फूटपाथवर चालताना नेहमी सतर्क राहण्यास सांगितले जाते. तरीही कधी चुकीमुळे किंवा चुकी नसतानाही अनेकांसोबत अपघाताच्या घटना घडतात. अशातच आणखी एका अपघाताची घटना नुकतीच समोर आली आहे. ज्यामध्ये एका महिलेनं गाडी चक्क भिंतीवर घातली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला घाईत असल्याचे पाहायला मिळत आहे. संधी मिळताच ती तिची कार वेगाने चालवून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करते. तेवढ्याच तिचा गाडीवरील ताबा सुटतो आणि मोठी दुर्घटना घडते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला तिची कार वेगाने चालवत रस्ता ओलांडताना एका भिंतीवर आदळते. त्यामुळे विटांची भिंत तुटून खाली कोसळते. यानंतर ही महिला कारमधून बाहेर येते आणि भीतीपोटी अपघातस्थळावरून पळताना दिसत आहे. गाडीची भयान अवस्था झालेली पहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

Cars Accident नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असलेल्या पहायला मिळत आहे. अनेकजण म्हणत आहे, रस्त्यावर गाडी चालवताना कधीही गाफील राहू नये आणि घाईघाईने गाडी चालवू नये. अश्या अपघाताच्या अनेक घटना समोर येत असतात. अनेक भीषण अपघातेही व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या