जंगलात लपला आहे डायनोसॉर.
नवी दिल्ली, 05 जुलै : इंटरनेटवर ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रमाची अनेक चित्रं किंवा फोटोज व्हायरल होतात. हे ऑप्टिकल इल्युजनचे फोटो मेंदूला चालना देतात, निरीक्षणशक्ती वाढवतात. ऑप्टिकल इल्युजनचे फोटो खूप मनोरंजक असतात, अनेकांना बराच वेळ घालवूनही ही कोडी सोडवता येत नाहीत. सध्या व्हायरल होणारा ऑप्टिकल इल्युजनचा फोटो एका घनदाट जंगलाचा आहे. त्यात लपलेला एक डायनॉसॉर वाचकांना शोधायचा आहे. ऑप्टिकल इल्युजनचे लिट्रल, सायकोलॉजिकल आणि कॉग्निटिव्ह असे तीन मुख्य प्रकार आहेत. भास हा अशावेळी होतो जेंव्हा डोळे एखादी वस्तू पाहताना घोळ करतात आणि मेंदुही त्याचा अर्थ लावण्यात चुकतो. कधीकधी डोळे ती वस्तू नीट पाहू शकत नाहीत तर कधी डोळ्यांनी पाहिलेल्या वस्तूंचा अर्थ मेंदू नीट लावू शकत नाही अशा दोन्ही वेळी आपल्याला भास होतो. VIRAL NEWS : गाढवासह असे 8 प्राणी जे उभ्या उभ्याच झोपतात; पण आपल्यासारखा त्यांचा तोल का जात नाही? जेव्हा आपले मेंदू डेटाचा चुकीचा अर्थ लावतात आणि एखाद्या वस्तूचे भौतिक गुणधर्म चुकीच्या पद्धतीने ओळखतात तेव्हा शाब्दिक भ्रम निर्माण होतात. मेंदू आणि डोळ्यांद्वारे दृश्य माहितीच्या प्रक्रियेतील विकृतीमुळे शारीरिक भ्रम निर्माण होतात. संज्ञानात्मक भ्रम उद्भवतात जेव्हा आपला मेंदू आपल्यासाठी बाह्य दृश्य माहिती चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करतो. ऑप्टिकल इल्युजन आव्हानात्मक आणि मनोरंजक दोन्ही असू शकतात. जरी तुम्ही स्वतःला बारीक निरीक्षणकर्ते समजत नसाल तरीही तुम्ही हा खेळ खेळू शकता. यामुळे तुमची निरीक्षण क्षमता सुधारण्यास मदत होईल. या फोटोमध्ये युजर्सना जंगलात उंच झाडं आणि त्याची मुळंही दिसत आहेत. यातच तुम्हाला डायनॉसॉर शोधायचा आहे. Optical Illusion Photo : या माशात लपलेत 2 पक्षी; 5 सेकंदांमध्ये शोधून दाखवा होय! या जंगलात एक डायनॉसॉर आहे आणि त्याला तुम्हाला अवघ्या काही सेकंदांत शोधायचं आहे. डायनॉसॉर शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 7 सेकंद आहेत. तुम्ही डायनॉसॉर शोधत आहात ना? आम्ही काउंटडाउन सुरू करतोय…7, 6, 5, 4, 3, 2, आणि शेवटी 1. तुमची डायनॉसॉर शोधण्याची वेळ संपली आहे. फोटो नीट पाहून तुम्ही डायनॉसॉर शोधू शकलात का? डायनॉसॉर शोधला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि नसेल शोधू शकलात तर थांबा आणि तो कुठे लपलाय हे माहीत करून घ्या.
जर तुम्हाला डायनॉसॉर सापडला असेल तर अभिनंदन! पण जर तुम्हाला डायनॉसॉर सापडला नसेल तर निराश होऊ नका. आम्ही तुम्हाला मदत करतो. आम्ही खाली एक फोटो दिला आहे, त्यामुळे डायनॉसॉर कुठे आहे, ते मार्क केलं आहे. त्यावरून तुम्ही डायनॉसॉर या फोटोत नक्की कुठे आहे, ते जाणून घेऊ शकता.