JOIN US
मराठी बातम्या / Viral / रहदारीच्या रस्त्यावर चालत्या गाडीत केली चोरी; VIDEO पाहून चक्रावून जाल

रहदारीच्या रस्त्यावर चालत्या गाडीत केली चोरी; VIDEO पाहून चक्रावून जाल

सध्या चोरीच्या एका मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे (Shocking Theft Incident Video). यात चोराने चोरी करण्यासाठी वापरलेला पद्धत पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 19 मार्च : जगभरात अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे चोर आहेत, जे चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या आणि अजब पद्धतींचा वापर करतात. तुम्ही अनेकदा अशा चोऱ्यांबद्दल ऐकलं असेल ज्यात चोर दुकान किंवा घरातून सगळं सामान घेऊन फरार होतात आणि कोणाला त्याची भनकही लागत नाही. काही चोर तर असेही असतात, जे सीसीटीव्हीलाही चकमा देऊन चोरी करून फरार होतात. काही चोर कोणालाही न घाबरता (Fearless Thieves) अगदी दिवसाढवळ्या आणि गर्दीच्या ठिकाणीही चोरी करतात. तर काही चोरीच्या घटना मात्र अतिशय मजेशीर असतात. जेव्हा आपसात भिडले ब्लॅक पँथर आणि बिबट्या; खतरनाक फाईटचा शेवट बघाच, VIDEO सध्या चोरीच्या अशाच एका मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे (Shocking Theft Incident Video). यात चोराने चोरी करण्यासाठी वापरलेला पद्धत पाहून तुम्हीही चक्रावून जाल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका रस्त्यावरुन चाललेल्या गाडीमध्ये मागच्या बाजूला काही सामान ठेवलेलं आहे. एक व्यक्ती या गाडीच्या मागे असलेल्या थोड्या जागेत उभा राहून यातलं सामान चोरी करत आहे आणि त्याच गाडीच्या मागे असलेल्या दुचाकीवरील आपल्या मित्रांकडे हे सामान देत आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडिओ पाहून सुरुवातीला समजत नाही की हा तरुण नेमकं काय करतोय. मात्र काहीच वेळात लक्षात येतं, की हे चोरीचं प्रकरण आहे. इतके निडर चोर याआधी तुम्ही कदाचितच पाहिले असतील, जे भररस्त्यावर चालू गाडीतून सामान चोरी करतात. हा व्हिडिओ मजेशी आणि तितकाच हैराण करणाराही आहे. व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. चवताळलेल्या बैल वेगात मागे धावू लागला अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO हा मजेशीर चोरीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर swami_7773 नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 1.7 मिलियन म्हणजेच 17 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. तर 47 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, दिवसाढवळ्या चोरी. दुसऱ्या एकाने लिहिलं, चोरी तर लपून केली जाते, हा तर डाका आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या