हत्ती काठी घेऊन लागला गेंड्याच्या मागे
नवी दिल्ली, 19 जून : जंगलातील अवाढव्य प्राणी आणि त्यांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांचीही चांगलीच पसंती पहायला मिळते. यामध्ये प्राण्यांचे अनेक विचित्र, थराराक, धक्कादायक व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच दोन प्राण्यांच्या लढाईचा व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये हत्ती आणि गेंड्याची दरमादरमी पहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. दोन अवाढव्य शरिराच्या आणि शक्तिशाली प्राण्यांची लढाई पहायला कोणाला आवडणार नाही. नुकताच असा व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये हत्ती आणि गेंड्याची चकमक दिसतेय. काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि चर्चेत आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलामध्ये काही हत्ती आणि गेंडा निवांत फिरत आहेत. तेवढ्यात एक हत्ती सोंडेमध्ये काठी घेऊन गेंड्याच्या दिशेने चालायला लागतो. सुरुवातीला हत्तीला काठी घेऊन आपल्याकडे येताना पाहून गेंडा दबकतो आणि मागे होतो. हत्तीची काठी खाली पडते तो ती उचलायला जातो या संधीचा फायदा घेत गेंडा हत्तीवर हल्ला करतो. मग हत्ती काठी उचलून जोरात दूर फेकून देत गेंड्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो.
@blabla112345 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 34 सेकंदांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून व्हिडीओवर भरपूर कमेंटही पहायला मिळत आहे. व्हिडीओ अनेक वेळा पाहिला जात आहे. दरम्यान, असे प्राण्यांच्या गरमागरमीचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. एवढंच नाही हल्ल्याच्या शिकरीचा थरारही समोर येत असतात. नेटकरी प्राण्यांच्या व्हिडीओंना चांगली पसंती देतात.