JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video: हत्तीच्या हद्दीत घुसलेल्या व्यक्तीसोबत चवताळलेल्या गजराजनं काय केलं पाहा

Viral Video: हत्तीच्या हद्दीत घुसलेल्या व्यक्तीसोबत चवताळलेल्या गजराजनं काय केलं पाहा

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस चुकून हत्तीच्या हद्दीत घुसल्याचं दिसतं, मग त्याचं काय झालं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल

जाहिरात

जंगलात घुसलेल्या व्यक्तीच्या मागे धावू लागला चवताळलेला हत्ती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 12 जून : जंगलात फिरणारे काही प्राणी शांत स्वभावाचे असतात तर काही नजर पडताच हल्ला करण्याच्या बेतात असतात. असेही काही प्राणी आहेत जे शांत असतात, परंतु त्यांना त्रास झाला की मग ते भयानक रूप धारण करतात. असाच एक प्राणी म्हणजे हत्ती, जो कोणालाही लवकर विनाकारण त्रास देत नाही. पण एकदा त्याला राग आला की समोर उभ्या असलेल्या कोणालाच तो सोडत नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस चुकून हत्तीच्या हद्दीत घुसल्याचं दिसतं, मग त्याचं काय झालं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. अबब! अवाढव्य हत्तीही करतात योगा; PHOTO पाहून तोंडात बोटं घालाल व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की, संतापलेला गजराज धावत एका माणसाचा पाठलाग करत आहे. ती व्यक्ती हत्ती पासून वाचण्यासाठी पळतानाही दिसत आहे. व्हिडिओ पाहून हे स्पष्ट होत आहे की, हत्ती पाठलाग करत असल्याचं पाहून त्या व्यक्तीला क्षणभर डोळ्यासमोर आपला मृत्यू दिसला असेल. जीव वाचवण्यासाठी व्यक्ती धावताना दिसत आहे. व्यक्ती हत्तीच्या परिसरातून बाहेर येताच हत्तीही शांत होतो. यानंतर आणखी काही लोक गाडीने तिथे येतात. कसा तरी हा माणूस आपला जीव वाचवण्यात यशस्वी होतो.

संबंधित बातम्या

गजराजच्या रागाचे कारण काय होतं, हे आतापर्यंत कळालं नाही. मात्र, ही व्यक्ती चुकून हत्तीच्या हद्दीत घुसल्याचं बोललं जात आहे. एवढ्यावरच संतापलेल्या हत्तीने त्या माणसाला धडा शिकवला. हा व्हिडिओ खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. त्या व्यक्तीने तिथून पळ काढून आपला जीव वाचवला, नाही तर हत्तीने त्याच्यावर हल्ला केला असता. संतप्त हत्तीचा सामना करणं फार कठीण असतं. हा व्हिडिओ तामिळनाडूचा असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र ती व्यक्ती गजराजच्या परिसरात काय करत होती आणि तिथे कशी पोहोचली हे सध्या तरी कळू शकलेलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या