हत्तीचा तरुणीवर हल्ला
मुंबई 29 एप्रिल : हत्ती दिसायला जेवढे बलाढ्य आणि शक्तिशाली असतात, तेवढेच ते खूप हुशार आणि उदार असतात. ते बहुधा माणसांशी खूप मैत्रीपूर्ण असतात, पण जेव्हा गजराजला राग येतो तेव्हा त्यांना हाताळणं कठीण होतं. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये हा महाकाय प्राणी एका महिलेवर अचानक हल्ला करतो.
ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक हत्ती एका महिलेवर हल्ला करताना दिसत आहे. ही महिला केळी दाखवून हत्तीचं लक्ष वेधण्याचा आणि त्याला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही घाबरेल आणि यापुढे असं काही करण्यापूर्वी शंभर वेळा नक्कीच विचार करेल. हा व्हिडिओ पाहून अंदाज बांधता येतो की, महिलेवर हल्ला किती वेगाने झाला होता. आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहा.
व्हिडिओमध्ये एक महिला केळी घेऊन हत्तीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नदीच्या पात्रावर उभा असलेला हत्ती त्या महिलेजवळ येतो आणि नंतर तिला त्याच्या सोंडेने ढकलून देतो. व्हिडिओ पाहून अंदाज बांधता येतो की महिलेला किती दुखापत झाली असावीय. मात्र हत्तीच्या हल्ल्यानंतर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ हळूहळू सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा (IFS अधिकारी) यांनी 27 एप्रिल रोजी ट्विटरवर पोस्ट केला होता.आतापर्यंत 1.3 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, हजारो लोकांनी लाईकही केला आहे.