JOIN US
मराठी बातम्या / Viral / तरुणांनाही लाजवेल असा आजीआजोबांचा VIDEO; या वयस्कर कपलला पाहून नेटिझन्स हैराण

तरुणांनाही लाजवेल असा आजीआजोबांचा VIDEO; या वयस्कर कपलला पाहून नेटिझन्स हैराण

या वयातही या कपलने असं काही केलं की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जानेवारी : वय वाढलं की व्यक्ती फार काही करू शकत नाही, जो काही जोश असतो तो तरुणांमध्येच असतो, असं सामान्यपणे अनेकांना वाटतं. पण सोशल मीडियावर सध्या अशाच वयस्कर कपलचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. खरंतर या आजीआजोबांचा व्हिडीओ पाहून तरुणांनाही लाज वाटेल (Romantic Video of elderly couple). वयस्कर दाम्पत्य रस्त्यावर असं काही करताना दिसलं की सर्वजण हैराण झाले आहे. या वयातही या कपलचा असा जोश म्हणजे प्रत्येकाला आश्चर्यचकित करणारा असाच आहे. हे कपल अशा स्थितीत आणि अशा पद्धतीने एक्सरसाईझ करत आहे, ज्याचा आपण विचारही करणार नाही (Elderly couple kissing while excercising video) . व्हिडीओत पाहू शकता, रस्त्याच्या कडेला एक वयस्कर कपल दिसतं आहे. रस्त्यावर काही खांब लावले आहेत, या खांबांच्या वर वयस्कर व्यक्ती आडव्या स्थिती आहेत. तर वयस्कर महिला खांबला लटकून आहे. ते दोघंही  एक्सरसाईझ करत आहेत (Elderly Couple excercising on road kissing video). हे वाचा -  साधं शरीर हलवूही शकत नव्हता आणि अचानक नाचूच लागला लकवाग्रस्त रुग्ण; पाहा VIDEO वयस्कर पुरुष पुशअप्स मारतो आहे. तर वयस्कर महिला पुलअप्स करताना दिसते आहे. यातही महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाईझ करता करता हे कपल एकमेकांना किसही करत आहे.

संबंधित बातम्या

गूड न्यूज मुव्हमेंट नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जे कपल एकत्र वर्कआऊट करतात ते नेहमी एकत्र राहतात, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हे वाचा -  ‘या’ मॉडेलचं वय काय असेल? 95 टक्के लोकांनी दिलंय चुकीचं उत्तर या वयातही या कपलला अशा पद्धतीने एक्सरसाईझ करताना पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. काही युझर्सनी त्यांची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी मात्र त्यांचं फिटनेस आणि त्यांच्यातील प्रेम असंच राहो अशी प्रार्थना केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या