मराठी बातम्या / बातम्या / Viral / भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे पुढच्याच क्षणी व्यक्तीसोबत घडलं धोकादायक, पाहा Video

भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे पुढच्याच क्षणी व्यक्तीसोबत घडलं धोकादायक, पाहा Video

व्हायरल व्हिडीओ

दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. भररस्त्यात अनेक अपघात होताना दिसतात. सोशल मीडियावरही अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर येतात.


नवी दिल्ली, 17 मार्च : दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. भररस्त्यात अनेक अपघात होताना दिसतात. सोशल मीडियावरही अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर येतात. भरधाव वेगाने गाडी चालवणे, नको ते स्टंट करणे यामुळे अनेक अपघात होतात. यामध्ये कधी कधी चुकी नसलेली व्यक्तीही जखमी होते. त्यामुळे रस्त्यावर कायम सावधपणे आणि काळजीपूर्वकपणे वावरावे असं कायम सांगितलं जातं. तरीही असे नमुने मिळतातच जे कोणाचंही ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना अशा स्टंटमुळे त्याच्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागते.

सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्येही असाच काहीसा प्रकार पहायला मिळत आहे. अपघाताची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्यक्तीसोबत घडलेला संपूर्ण प्रकार व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक बाईकस्वार व्हिडीओ बनवत आहे. त्याच्यासमोर आणखी एक व्यक्ती गाडी चालवत आहे. मात्र त्याच्या गाडीचा स्पीड जास्त असून तो स्टाईलने गाडी चालवताना दिसतोय. व्यक्ती स्कूटी अगदी अस्थाव्यस्थ पद्धतीने चालवतोय.

इकडे तिकडे वळण घेत व्यक्ती स्पीडने स्कूटी चालवतोय. अचानक त्याचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि तो धडामकन खाली कोसळतो. हेल्मेटही न घेतल्यामुळे त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली. हा व्हिडीओ @hvgoenka यांनी ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओवर खूप कमेंटही येताना दिसत आहे. व्हिडीओसोबत त्यांनी लिहिलं, 'आता तुम्हाला योग्य टायरची गरज आहे'

दरम्यान, रस्त्यावर निष्काळजीपणे गाडी चालवणे, स्टंट करणे, भरधाव वेगाने गाडी पळवणे यामुळे असे अपघात घडतात. यापूर्वीही असे अनेक अपघाताचे व्हिडीओ समोर आले आहेत. अनेक धोकादायक, शॉकिंग, व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. त्यामुळे रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

First published: March 17, 2023, 17:08 IST
top videos
  • Mumbai News : धारावीत 10 बाय 10 ची खोली; कंपाउंडरचं काम करणारी शिरीन बारावीला पास झाली!
  • Pune News : पॅरालिसिस आणि ब्रेन अटॅक; तरी विशाल खचला नाही, 44 वर्षी झाला बारावी पास!
  • Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजीनगरमध्ये वाढले प्लास्टिक सर्जरीचे प्रमाण, पाहा काय आहे कारण Video
  • Beed News : आपली एसटी सगळ्यात भारी, बीडकरांच्या प्रेमाने लालपरीचा नवा रेकॉर्ड Video
  • Wardha News: पंक्चरवाल्याची मुलगी तालुक्यात पहिली, निलूच्या यशाने गावकरी भारावले, Video
  • Tags:Accident, Bike accident, Social media viral, Video viral, Viral

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स