JOIN US
मराठी बातम्या / Viral / ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! 18 व्हिलरचा भलामोठा ट्रक पठ्ठ्याने असा पार्क की VIDEO तुफान व्हायरल

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! 18 व्हिलरचा भलामोठा ट्रक पठ्ठ्याने असा पार्क की VIDEO तुफान व्हायरल

ड्रायव्हरची पार्किंग करण्याची स्टाईल आणि टॅलेंट पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

जाहिरात

ट्रक पार्किंगचा जबरदस्त व्हिडीओ. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 27 नोव्हेंबर : तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल, तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर तुम्हाला पार्किंग करणं किती कठीण काम असतं, याची कल्पना असेलच. विशेषतः सार्वजिनक ठिकाणी जिथं बऱ्याच गाड्या पार्क केलेल्या असतात आणि त्या गाड्यांना धक्का न पोहोचवता मर्यादित जागेत आपली गाडी पार्क करायची असते. त्यावेळी काय काय करावं लागतं हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कुणाला माहिती असेल. त्यामुळे गाडी पार्किंग करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. खरंतर पार्किंग म्हणजे एक स्किल. सर्वांनाच ते सहजरित्या जमतं असं नाही. काही लोक पार्किंग करण्याच इतकेच पटाईत असतात की त्यांच्या टॅलेंटला दाद द्यायलाच हवी. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. कित्येकांना सहजरित्या फोर व्हिलर पार्क करणंही जमत नाही. पण एका ड्रायव्हरने भलामोठा ट्रक अशा पद्धतीने पार्क केला आहे की सर्वजण हैराण झाले आहेत. तुम्हीही विचारही केला नसेल इतकी ही खतरनाक पार्किंग आहे. पार्किंगची पद्धत पाहूनच तुम्ही हडबडून जाल. ही पार्किंग इतकी जबरदस्त आहे म्हणूनच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे आणि या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे वाचा -  रेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! हा VIDEO आता पाहिला नाही तर नंतर होईल पश्चाताप व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक भलामोठा ट्रक दिसतो आहे. माहितीनुसार 18 व्हिलरचा हा ट्रेलर ट्रक आहे. ट्रकचा दरवाजा उघडा आहे आणि तिथं बाहेर ट्रकजवळ एक व्यक्ती उभी आहे. हा ट्रक एका ठिकाणी पार्क केला जातो आहे. सामान्यपणे तुम्ही असं दृश्य पाहिलं असेल की एक व्यक्ती ट्रकच्या बाहेर आणि एक ट्रकच्या आत ड्रायव्हिंग सीटवर. बाहेरील व्यक्ती ड्रायव्हरला पार्किंगसाठी गाइड करते. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुरुवातीला तसंच वाटेल. पण नंतर मात्र धक्का बसेल.

कारण ट्रकबाहेर असलेली व्यक्ती स्वतःच हा ट्रक चालवते आहे. म्हणजे सीटवर न बसता ट्रकच्या बाहेर उभं राहून ती ट्रकचं स्टिअरिंग फिरवते आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता त्या व्यक्तीचा एक हात ट्रकच्या आत स्टिअरिंगवर आहे. चालत्या ट्रकच्या बाहेर उभं राहून स्वतःच ड्रायव्हिंग आणि पार्किंग करते आहे. हे वाचा -  नशिब बलवत्तर म्हणून वाचले प्राण… हा थरारक Video पाहून तुमचा देखील श्वास थांबेल @unbothered___81 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  यावर बऱ्याच कमेंट येत आहे. नेटिझन्सच या ड्रायव्हरचं पार्किंगचं अनोखं टॅलेंट पाहून थक्क झाले आहेत.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या