कारवाई टळेल, भरपाई मिळेल; तुमच्या गाडीने अपघात झाल्यास करा 'हे' काम

तुमच्या गाडीने ज्या गाडीचा अपघात होतो त्याचा चालक तुमच्याकडून भरपाई घेतो.

गाडीचा विमा असल्यास अपघातस्थळी कोणताही करार करू नका.

पोलिसांना माहिती द्या आणि तुमच्या इन्शुरन्स कंपनीलाही कळवा.

गाडीचा विमा असेल, तर नुकसान भरपाईची जबाबदारी विमा कंपनीची

ज्याच्या वाहनाचं नुकसान झालं, ती व्यक्तीही त्याच्या इन्शुरन्स कंपनीकडे दावा करू शकते.

विमा कंपनीने तुमचा दावा स्वीकारण्यासाठी तुमच्याकडे गाडीची वैध कागदपत्रं हवीत. 

अपघातात कोणी जखमी, मृत झालं तर विमा कंपनी तुमची केस कोर्टात लढवते.

कोर्टाकडून समन्स आला तर तिथं हजर होऊन अपघाताबाबत योग्य माहिती द्या.

पण चूक तुमची असल्यास विमा कंपनी हात वर करेल, तुम्हीही अडचणीत याल.