JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : सुकलेल्या भाजीला क्षणात केले ताजे, केमिकलच्या वापरामुळे लोकांचा संताप

Viral Video : सुकलेल्या भाजीला क्षणात केले ताजे, केमिकलच्या वापरामुळे लोकांचा संताप

आजकाल फळे, भाजीपाला ताजातवाना दिसण्यासाठी त्याच्यावर केमिकल फवारले जाताना दिसतात. एवढंच नाहीतर अनेकदा भाजीपाला अस्वच्छ पाण्यानेही धुतल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 मार्च : आजकाल फळे, भाजीपाला ताजातवाना दिसण्यासाठी त्याच्यावर केमिकल फवारले जाताना दिसतात. एवढंच नाहीतर अनेकदा भाजीपाला अस्वच्छ पाण्यानेही धुतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे खाण्याच्या गोष्टी खरेदी करतना खूप काळजीपूर्वक घेण्याची गरज आहे. अशातच आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये, सुकलेली भाजी ताजी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. काही काळापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहण्यात आला होता, ज्यामध्ये एक दुकानदार वांग्यावर जांभळा रंग फवारताना दिसत होता, तर दुसरा दुकानदार पालक हिरव्या रंगात बुडवून ताजे ठेवण्याचा प्रयत्न करत होता. या व्हिडिओंनी लोकांमध्ये संताप दिसून आला होता. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही काही कमी नाही. यामध्येही एक व्यक्ती रसायनांच्या मदतीने शिळ्या पालेभाज्या ताज्यातवान्या करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पूर्णपणे कोमेजलेल्या हिरव्या भाज्या रासायनिक पाण्यात टाकून बाहेर काढते. यानंतर, थोड्याच वेळात, ती भाजी पूर्णपणे ताजी होते, जी पाहून कोणीतरी गोंधळून जाईल की भाजी खरंच ताजी आहे की त्याच्यावर केमिकलचा वापर झालाय.

संबंधित बातम्या

हा धक्कादायक व्हिडिओ @amitsurge नावाच्या ट्विचर आयडीसह शेअर करण्यात आला आहे. एक मिनिट 42 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 60 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. हा प्रकार पाहून लोक संताप व्यक्त करत आहे.

दरम्यान, बऱ्याचदा असे घडते की ताज्या दिसणाऱ्या भाज्या देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरतात, कारण त्या भाज्या प्रत्यक्षात केमिकलने लवकर पिकवल्या गेल्या आहेत किंवा ताज्या दिसण्यासाठी त्यांना रंग दिला गेला आहे. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लोक खरेदी करतानाही घाबरत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या