नवी दिल्ली 16 मार्च : पाळीव प्राण्यांमध्ये सगळ्यात ईमानदार (Most Loyal Animal) कोणी असेल तर तो कुत्रा आहे, असं म्हटलं जातं. तुम्ही पाळीव श्वानांची आपल्या घरातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली तर तेदेखील तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतात. तुमच्या सुरक्षेसाठी ते आपला जीवही धोक्यात घालू शकतात. इतकंच नाही तर वर्षानुवर्षे ते आपल्या मालकाला विसरतही नाहीत. असाच पेरू येथील वागुतो हा एक श्वान अनेक वर्षांपूर्वी मरण पावलेल्या आपल्या मालकाची आजही समुद्राच्या किनारी बसून वाट पाहात आहे (Dog Waiting for Dead Owner at Beach from Many Years). VIDEO - शेरास सव्वाशेर! तोऱ्यात चॅलेंज देणाऱ्या तरुणालाच खोडकर माकडाने… जूली मेजिया नावाच्या महिलेनं वागुतो नावाच्या श्वानाची मन हेलावणारी कहाणी जगासमोर मांडली आहे. महिलेला लिमा येथील पुंता नेग्रा बीचवर एक दिवस वागुतो बसलेला दिसला. श्वानाला तिथे पाहून तिला प्रश्न पडला की समुद्राच्या किनारी हा कोणाची वाट पाहात असेल. याचदरम्यान एका स्थानिक व्यक्तीने महिलेला वागुतोची कहाणी सांगितलं. ही कहाणी महिलेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणली. एका मासेमारी करणाऱ्या व्यक्तीने वागुतोला पाळलं होतं आणि श्वान त्यांच्यासोबतच नेहमी राहात असे. जिथे मालक जाईल, तिथे वागुतो त्याच्यासोबतच जात असे. इतकंच नाही तर मालक मासे पकडण्यासाठी गेला तरी वागुतो किनाऱ्यावर बसून मालकाची वाट बघत असे. जेव्हा मालकाचा मृत्यू झाला तेव्हाही त्याने मालकाला समुद्राच्या किनाऱ्यावरच सोडलं होतं. याच कारणामुळे आपल्या मालकाच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष उलटूनही हा श्वान रोज समुद्रकिनारी येतो आणि मालकाची वाट बघतो. इथे बराच वेळ मालकाची वाट पाहून तो घरी निघून जातो आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा इथे येतो. बापरे! हे काय आहे? मुलांसाठी खरेदी केली Doll; घरी आणताच आईला फुटला घाम वागुतोचा समुद्राकडे पाहातानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही दक्षिण अमेरिकेतील वृत्तपत्रांनीही त्याची कहाणी छापली आहे. मालकाच्या मृत्यूनंतर आता त्याची काळजी त्याच गावातील एक महिला घेते आणि श्वान तिच्याच घरात राहातो. वागुतो तिच्यासोबत आनंदी आहे, मात्र अजूनही तो आपल्या मालकाला विसरलेला नाही. यामुळे तो रोज समुद्रकिनारी जातो. आतापर्यंत त्याची ही कहाणी फक्त स्थानिक लोकांना माहिती होती, मात्र आता ती जगभरात प्रसिद्ध झाली आहे.