JOIN US
मराठी बातम्या / Viral / हा नेमका कुत्रा आहे की कोंबडा? मजेशीर VIDEO पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल

हा नेमका कुत्रा आहे की कोंबडा? मजेशीर VIDEO पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल

एक कुत्रा भितीमुळे भुंकायचंच विसरून गेला. हा श्वान भुंकतोय खरा मात्र तो एखाद्या कोंबड्याप्रमाणे आवाज काढत आहे (Dog Started Barking like a Chicken).

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 03 जानेवारी : सोशल मीडियावर प्राण्यांचे नवनवीन व्हिडिओ सतत व्हायरल होत राहतात. लोक आपल्या पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांचीही भरपूर पसंती मिळते. याच कारणामुळे प्राण्यांचे व्हिडिओ अपलोड होताच व्हायरल (Viral Videos of Pet Animals) होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. ‘त्या’ जेवणामुळे सुरू होताच कपलच्या Love Story चा END; कारण जाणून व्हाल थक्क हा व्हिडिओ एका क्यूट श्वानाचा आहे, जो अतिशय मजेशीर आहे. आपल्याला माहिती आहे की जगातील प्रत्येक प्राण्याची आपली एक भाषा किंवा आवाज असतो. माणसांप्रमाणे हे प्राणीही एकमेकांसोबत संवाद साधत असतात. मात्र जेव्हा भीती वाटते तेव्हा माणसांप्रमाणेच या प्राण्यांचा आवाजही बदलतो. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही हेच पाहायला मिळतं. यात एक कुत्रा भितीमुळे भुंकायचंच विसरून गेला. हा श्वान भुंकतोय खरा मात्र तो एखाद्या कोंबड्याप्रमाणे आवाज काढत आहे (Dog Started Barking like a Chicken).

संबंधित बातम्या

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक श्वान आपल्या मालकासमोर एका काउचवर बसला आहे. यादरम्यान एका दुसऱ्या कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज येतो. हे पाहून श्वान घाबरतो आणि त्याच्या तोंडातून आवाजच निघत नाही. तो इतका घाबरतो की भुंकणंही विसरून जातो. दुसऱ्यांदा जेव्हा तो भुंकण्यासाठी आपलं तोंड उघडतो तेव्हा तो एखाद्या कोंबड्याप्रमाणे ओरडू लागतो. श्वानाचा हा आवाज ऐकून मालकही हैराण होतो. बदकाची शिकार करण्यासाठी आले 4 वाघ; पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही, VIDEO हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर dogedimes नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, बहुतेक माझा श्वान भुंकणं विसरला. यापुढे मालकाने लिहिलं, साउंडेड लाईक अ चिकन. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 2 लाख 58 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. तर करोडो लोकांनी पाहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या