JOIN US
मराठी बातम्या / Viral / या फोटोतील शिड्या वर जातायत की खाली? तुम्ही देऊ शकता काय योग्य उत्तर?

या फोटोतील शिड्या वर जातायत की खाली? तुम्ही देऊ शकता काय योग्य उत्तर?

हा फोटो पहिल्या नजरेत एकदम साधा वाटत आहे. पण तुम्ही नीट पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल की या फोटोतील शिडी वर देखील जात आहे आणि खाली ही.

जाहिरात

सोर्स : सोशल मीडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जुलै : सोशल मीडियावर तुम्हाल असंख्य ऑप्टिकल इल्यूजन संदर्भात व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतील. हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांची परिक्षा घेतात. शिवाय आपल्या मेंदूला चालना देखील देतात. असाच एक फोटो समोर आला आहे, जो पाहून तुम्ही डोकं खाजवाल. हा फोटो पहिल्या नजरेत एकदम साधा वाटत आहे. पण तुम्ही नीट पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल की या फोटोतील शिडी वर देखील जात आहे आणि खाली ही. या एक ऑप्टिकल इल्यूजनने लोकांना पूर्णपणे गोंधळात टाकले आहे, त्यात दोन लोक आहेत आणि ते पायऱ्या चढत आहेत की खाली जात आहेत असं दोन्ही चित्रात दिसत आहे. तुम्ही या गूढ ऑप्टिकल इल्युजन इमेजकडे टक लावून पाहा आणि बघा तुम्हाला कळतंय का की या शिड्या वर जात आहेत की खाली? opticalillusionss नावाने एका इंस्टाग्राम पेजवर ऑप्टिकल इल्युजन पोस्ट करण्यात आला आहे. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये “- ते शिड्या वर चढतायत की खाली?” असा प्रश्न विचारला गेला आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही सांगा तुम्हाला या फोटोमधील शिड्या कुठच्या बाजूने जाताना दिसत आहेत. युजर्सचे तर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत ज्यामध्ये काहींचे म्हणणे आहे की या शिड्या खालच्या बाजूने जात आहे. कारण डावीकडील व्यक्ती खाली उतरताना भासत आहे. तर काही लोकांनी म्हटलंय की उजवीकडील व्यक्ती ही शिड्या वर चढताना दिसत आहे. त्यामुळे या शिड्या वर जात आहेत. आता तुम्ही सांगा तुम्हाला या शिड्या कोणत्या बाजूने जाताना दिसतायत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या