7 महिन्यांचं बाळ प्रेग्नंट
लखनऊ 29 जुलै : कधीकधी वैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रातही अशी अजब प्रकरणं समोर येतात, ज्याला आपण निसर्गाचा चमत्कार म्हणतो. असंच एक ताजं प्रकरण प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजमधून समोर आलं आहे. यात ऑपरेशनद्वारे 7 महिन्यांच्या मुलाच्या पोटातून 2 किलो वजनाचं दुसरं बाळ काढण्यात आलं आहे. मात्र, या गर्भात जीव नव्हता. विशेष म्हणजे मुलाच्या जन्मानंतर हा भ्रूण त्याच्या पोटात वाढू लागला होता. ही बाब समजताच रुग्णालयासह परिसरात खळबळ उडाली . अनेक लोक याला निसर्गाचा अनोखा चमत्कार म्हणत आहेत. दुसरीकडे वैद्यकशास्त्रात अशी प्रकरणं क्वचितच पाहायला मिळतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मुलाचे वडील प्रयागराजजवळ असलेल्या प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा येथील रहिवासी आहेत. ते कपडे शिवण्याचे काम करतात. Viral News: हे वाचून हॉटेल रूममधील बाथरूममध्ये टूथब्रश ठेवण्याचा विचारही करणार नाही; मॅनेजरने केला धक्कादायक खुलासा मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉ.डी कुमार म्हणाले की, सात महिन्यांचं बाळ पूर्णपणे निरोगी आहे. ते म्हणाले, ‘वैद्यकीय भाषेत आपण याला ‘फीटस इन फीटू’ म्हणजेच मुलाच्या आत मूल असं म्हणतो. अशी प्रकरणं अतिशय दुर्मिळ आहेत. अशी जगात आतापर्यंत सुमारे 200 प्रकरणे पाहिली गेली आहेत. डॉ. डी कुमार यांनी सांगितलं, की ही प्रक्रिया गर्भधारणेदरम्यानच सुरू होते. गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाच्या आत दुसरा गर्भ वाढू लागतो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, या स्थितीत दोन स्पर्म आणि दोन ओव्हमच्या मिलनातून दोन झिगोट्स तयार होतात. सध्या बालकावर बाल रुग्णालयात उपचार सुरू असून, तो पूर्णपणे निरोगी आहे.