JOIN US
मराठी बातम्या / Viral / YOGA बाबत डॉक्टरांनी असं काही सांगितलं की, पोस्टमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ

YOGA बाबत डॉक्टरांनी असं काही सांगितलं की, पोस्टमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ

योगाबाबत डॉक्टरने केलेली ही सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होते आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जून : काही दिवसांपूर्वीच योगा दिन साजरा झाला. फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील लोकांना योगाचं महत्त्व पटलं आहे आणि ते योगा करतात. अशात एका डॉक्टराने मात्र योगाबाबत असं काही सांगितलं आहे की खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर या डॉक्टरने योगाबाबत अशी पोस्ट केली की नेटिझन्स संतप्त झाले आहेत. ही पोस्ट व्हायरल होते आहे. हल्ली अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात योगानेच होते.  बर्‍याचदा लोक अयोग्य पदार्थ खाल्ल्याने लठ्ठ होतात. यानंतर वजन कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करतात. त्यापैकी एक म्हणजे योगा. योगा हा  सुटलेल्या पोटावर आणि वाढत्या वजनावर रामबाण उपाय आहे, हे अनेक लोक मानतात आणि अनेकांना त्याचा तसा परिणामही दिसून आला आहे. पण योगाद्वारे वजन कमी होत नाही असं कुणी म्हटलं तर?  या डॉक्टरने तेच केलं आहे. वयाच्या चौथ्या वर्षी बनली ‘योगी’, आईसोबत करते अवघडातले अवघड व्यायाम ‘द लिव्हर डॉक’ या नावाने प्रसिद्ध असलेले डॉ. सिरीयक एबी फिलिप्स यांनी अन्न, व्यायाम आणि योगाशी संबंधित काही माहिती दिली आहे. त्यांनी मिथकं सांगितली आहेत. डॉ. फिलिप्स यांनी 20 तथ्ये सांगणारे ट्विट केले आहे.  वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिण्यापासून ते निरोगी केसांसाठी बायोटिन गोळ्या घेण्यापर्यंत सर्व लोकप्रिय दावे त्यांनी खोडून काढले आहेत. यात योगाचाही समावेश आहे. योगाबाबत या डॉक्टरने जे काही सांगितलं त्यामुळे पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे आणि चांगलीच चर्चेत आली आहे. बिअर्डवालं कपल! नवऱ्यासोबत बायकोलाही दाढी-मिशा; कारणही आहे खास डॉक्टर फिलिप्स यांनी योगामुळे वजन घटत नाही असं म्हटलं आहे. त्यांच्या या मतावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

संबंधित बातम्या

तुमचं यावरील मत आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या