JOIN US
मराठी बातम्या / Viral / बोंबला! 'आता कसा होणार मी नवरा', तरुणासोबत डॉक्टरांनी भलतंच केलं, आता लग्नाचाही वांदा

बोंबला! 'आता कसा होणार मी नवरा', तरुणासोबत डॉक्टरांनी भलतंच केलं, आता लग्नाचाही वांदा

एका शारीरिक समस्येने त्रस्त असलेल्या तरुण रुग्णांसोबत डॉक्टरांनी असं काही केलं की त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**पाटणा, 17 फेब्रुवारी :**एका वयानंतर आपण लग्नाची स्वप्नं पाहू लागतो. आपलं लग्न होणार, आपण नवरा-नवरी बनवणार, या लग्नासाठी कितीतरी स्वप्नं रंगवलेली असतात. एका तरुणानेही आपल्या लग्नाचं असंच स्वप्नं पाहिलं होतं. पण त्याचं हे स्वप्नं आता उद्ध्वस्त झालं आहे आणि यासाठी कारणीभूत आहेत ते डॉक्टर. एक शारीरिक समस्या असलेल्या या तरुणासोबत डॉक्टरांनी असं काही केलं की त्याच्या लग्नाचेही आता वांदे झाले आहेत. बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील हे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदारामुळे तरुण रुग्णाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.हा रुग्ण डॉक्टरांकडे आला होता एका कारणासाठी पण डॉक्टरांनी त्याच्यावर भलतेच उपचार केले.  डॉक्टरांची या एका छोट्याशा चुकीची मोठी किंमत या तरुणाला आयुष्यभर मोजावी लागेल. हे वाचा -  पायाची किरकोळ दुखापत 11 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतली; मृत्यूचं कारण धक्कादायक या तरुणाचं हायड्रोसील वाढलं होतं. यावर उपचार करण्यासाछी चैनपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला होता. तिथं त्याच्या हायड्रोसीलचं ऑपरेशन होणार होतं. त्याच ऑपरेशन झालं पण ते हायड्रोसीलचं नव्हे तर नसबंदीचं. जेव्हा याबाबत माहिती झाली तेव्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धक्काच बसला. नसबंदी झाल्याने त्याच्यासह त्याच्या कुटुंबाला आता त्याच्या लग्नाची चिंता लागून राहिली आहे.

तरुण म्हणाला, “माझं हायड्रोसिल वाढलं होतं म्हणून आशा वर्करच्या सल्ल्यानुसार मी ऑपरेशन करण्यासाठी सरकारी रुग्णालयात आलो. ऑपरेशन झालं पण हायड्रोसिलऐवजी नसबंदी करण्यात आली. आता माझं लग्न कसं होणार, मी नवरा कसा बनवणार. माझं नवरदेव बनवण्याचं स्वप्नं डॉक्टरांमुळे उद्ध्वस्त झालं आहे” हे वाचा -  लग्नाच्या आदल्या रात्री नवरा-नवरीने चुकूनही करू नयेत या 5 गोष्टी दरम्यान तरुण आणि त्याच्या कुटुंबाने डॉक्टराविरोधात कारवाईची मागणीही केली आहे. झी न्यूज हिंदीच्या वृत्तानुसार ज्या डॉक्टरावर आरोप करण्यात आले त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. आपण माहिती देऊनच नसबंदी केल्याचं ते म्हणाले. दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या