लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात. या नंतर नवरा-नवरी दोघांच्या आयुष्यात खूप काही बदलतं. त्यामुळेत नवरा-नवरीने काळजी घ्यायला हवी.
लग्नाच्या आधी काही गोष्टी केल्याने लग्नात अडथळे येऊ शकतात किंवा तुमच्या नव्या आयुष्यावर, नव्या नात्यांवरही परिणाम होऊ शकतो. या गोष्टी कोणत्या पाहुयात.
मद्यपान - नशा आपल्या विचारसरणीपासून शारीरिक अभिव्यक्तीपर्यंत सर्व काही बदलते. त्यामुळे लग्नाआधी वधू-वराने दारू पिऊ नये, नाहीतर लग्नात काहीतरी अडचण येईल.
हैदराबादमध्ये एका ३० वर्षीय महिलेला स्मार्टफोनमुळे दृष्टीदोषाचा त्रास झाला. तिला याचा त्रास थोडाथोडका नव्हे तर १८ महिने सहन करावा लागला. यावर बरेच उपचार केल्यानतंर आता ती पुन्हा नीट पाहू शकतेय.
एक्सला भेटणं - नवीन आयुष्यात पाऊल टाकताना जुनं विसरलेलंच चांगलं. त्यामुळे कितीही वाटलं तरी लग्नाच्या आदल्या दिवशी तुमच्या एक्सला भेटू नका. याच्या तुमच्या नव्या आयुष्यात किंबहुना लग्नातही अडथळा येऊ शकतो.
तणाव - लग्न म्हणजे खूप धावपळ असते, त्याचा ताणही येतो. तुम्ही जास्त ताण घेऊ नका. रिकाम्या पोटीही रक्तदाबाचा त्रास होतो. त्यावर ताण दिल्याने शरीर आजारी पडू शकते.
तक्रार करणं - लग्नात तुम्हाला काही आवडलं नाही, विधी-परंपरा खटकत असतील तरी तक्रार करू नका. तुमच्या नव्या आयुष्यात याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.