JOIN US
मराठी बातम्या / Viral / नवऱ्याने केली अशी टेस्ट, ज्यामुळे समोर आलं बायकोने 18 वर्षे लपवलेलं सिक्रेट

नवऱ्याने केली अशी टेस्ट, ज्यामुळे समोर आलं बायकोने 18 वर्षे लपवलेलं सिक्रेट

लग्नाच्या इतक्या वर्षांनी नवऱ्याला त्याच्या बायकोचं एका टेस्टमुळे असं सत्य समजलं की तो पुरता हादरला.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो - Canva

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 जून :  नवरा-बायकोचं नातं पारदर्शी असावं असं म्हणतात. पण तरी सर्वच गोष्टी जोडीदारा ला सांगितल्या जातात असं नाही. आपली बायको किंवा नवरा आपल्यापासून काही लपवत तर नाही ना? अशी चिंता अनेकांना असते. ते शोधून काढण्यासाठी काही लोक काय काय नाही करत. असंच एक प्रकरण ज्यात एका व्यक्तीने अशी टेस्ट केली ज्यामुळे त्याला त्याच्या बायकोने त्याच्यापासून 18 वर्षे लपवलेलं सिक्रेट समजलं आणि तो पुरता हादरला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट असते ती फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असते. काही गोष्टी या सर्वांना सांगायच्या असतात तर काही न सांगितलेल्याच बऱ्या असतात. त्यामुळे त्या लपवून ठेवल्या जातात. पण सत्य कधी लपून राहत नाही, म्हणतात ना, कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते समोर येतं आणि मग होत्याचं नव्हतं होतं. या व्यक्तीच्या बाबतीच तेच झालं. या व्यक्तीने स्वतःच आपली ही स्टोरी सोशल मीडियावर सांगितली आहे. रेडिटवर त्याने आपली व्यथा मांडली आहे.

त्याने सांगितल्यानुसार तो आणि त्याची बायको दोघंही 20 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.  त्यांनी एकत्र स्टार्टअप सुरु केलं होतं आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याच वर्षी त्यांनी लग्न केलं. पण नंतर व्यवसायावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि ते वेगळे झाले. मात्र, काही आठवड्यातच ते पुन्हा एकत्र आले. बिअर्डवालं कपल! नवऱ्यासोबत बायकोलाही दाढी-मिशा; कारणही आहे खास पुन्हा एक झाल्यानंतर त्याची पत्नी प्रेग्नंट राहिली.  तिने जुळ्यांना जन्म दिला. एक मुलगा आणि एक मुलगी. आता ही मुलं 17 वर्षांची झाली आहेत.  हे कपल गेल्या 18 वर्षांपासून एकत्र राहत होते. आता त्यांनी मजेमजेत आपल्या संपूर्ण कुटुंबाची डीएनए टेस्ट करून घेतली. या डीएनए चाचणीत त्याला त्याच्या बायकोचं सत्य समजलं. असं सत्य जे तिने त्याच्यापासून आणि कुटुंबापासून तब्बल 18 वर्षे लपवून ठेवलं होतं. ज्या मुलांना तो आपलं म्हणतो, ती प्रत्यक्षात त्याची नसल्याचं डीएनए चाचणीतून समोर आलं आणि त्याला धक्का बसला. त्याच्या पत्नीच्या वन नाईड स्टँडचं सिक्रेट त्याच्यासमोर उघड झालं. जेव्हा हे दोघं वेगळे झाले होते, त्याच कालावधीत त्याच्या पत्नीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध होते आणि त्यामुळे ती प्रेग्नंट राहिली. टिप टिप बरसा पाणी… आणि कपल झालं रोमँटिक; रस्त्यावरच केलं असं काही की VIDEO VIRAL आता ही व्यक्ती  शॉकमध्ये आहे. कारण तो आपल्या पत्नी आणि मुलांशिवाय जगू शकत नाही आणि हे सत्य त्याला पचवताही येत नाही आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या