बंगळुरु 23 एप्रिल : कर्नाटकचा अग्नी खेळी उत्सव सध्या चर्चेत आहे. या उत्सवात दोन गावातील लोक एकमेकांवर पेटत्या मशाली फेकतात. येथील लोक आठ दिवस अग्नी खेळी किंवा थुतेधारा उत्सव साजरा करतात. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कतील येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरात (Sri Durgaparameshwari temple) नुकताच ‘अग्नी खेळी’ उत्सव साजरा करण्यात आला. उत्सवाचा एक भाग म्हणून दोन गावांतील लोकांनी एकमेकांवर जळत्या मशाली फेकल्या. याचा व्हिडिओ (Agni Kheli Video) समोर आला आहे. यात लोक एकमेकांवर पेटवलेल्या मशाली फेकताना दिसत आहेत (Devotees Hurled Fire at each other). ‘रण’रागिणीला सॅल्युट! अंगाची लाही लाही होत असतानाही बेशुद्ध वृद्धेला घेतलं पाठीवर; रणरणत्या वाळवंटात जीव वाचवण्यासाठी धडपड अग्नी खेळी उत्सवामुळे आपलं दु:ख दूर होतं, अशी लोकांची श्रद्धा आहे. सणाप्रमाणे आधी दोन्ही गावातील लोक देवीची मिरवणूक काढतात. त्यानंतर ते तलावात डुबकी घेतात. मग वेगवेगळे संघ नारळाच्या सालापासून बनवलेली मशाल पेटवतात आणि एकमेकांवर फेकतात. हा खेळ सुमारे 15 मिनिटे चालतो. या खेळात एखादी व्यक्ती केवळ पाच वेळा ज्वलंत मशाल फेकू शकतो. त्यानंतर मशाल विझवून तो तिथून निघून जातो.
अग्नी खेळी उत्सव 8 दिवस चालतो. दोन्ही गावातील लोक सणासुदीत मांसाहार आणि दारूचं सेवन करत नाहीत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या खेळात आर्थिक किंवा शारीरिकदृष्ट्या त्रासलेल्या व्यक्ती सहभाग घेतात. असं केल्यानं आई भवानी सर्व संकटं दूर करते, असं मानलं जातं. यात फक्त पुरुषांचाच सहभाग असतो.