नवी दिल्ली 29 ऑगस्ट : वहिनी आणि दिराचं नातं अतिशय पवित्र मानलं जातं. या नात्यात प्रेम आणि आदरासोबतच थोडी मस्ती आणि मस्करीही असते. सोशल मीडियवर वहिनी आणि दिराच्या व्हिडिओंना (Viral Video on Social Media) विशेष पसंती मिळते. हे दोघं कधी लग्नात डान्स (Wedding Dance) करताना दिसतात तर कधी एकमेकांसोबत मस्ती करताना. विविधतेनं भरलेल्या भारतात अनेक वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत. सोशल मीडियावर सध्या दीर आणि वहिनीच्या अशाच एका परंपरेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुलीच्या आनंदासाठी आईनं घेतला मोठा निर्णय; 53 व्या वर्षी स्वतः दिला नातीला जन्म सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रा नावाच्या व्यक्तीनं हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लग्नातील एक परंपरा म्हणून खेळला जाणारा खेळ शूट केला गेला आहे. यात दीर आणि वहिनी एकमेकांना मस्करीतच मारतात (Devar Bhabhi Fight Video). मात्र, या व्हिडिओमध्ये काही वेगळंच दिसतं. यात दीर खरोखरच काठीनं आपल्या वहिनीला मारताना दिसतो. यात जेव्हा दीर आपल्या वहिनीला काठीनं मारू लागला तेव्हा वहिनीनंही माघार घेतली नाही.
लग्नाचं निमंत्रण देऊनही पाहुणे गैरहजर; रागावलेल्या नवरीनं दिली अजब शिक्षा वहिनीनंही हातात काठी घेतली आणि सर्वांसमोरच आपल्या दिराला मारण्यास सुरुवात केली. कदाचित हादेखील या परंपरेचाच एक भाग असावा. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि याला नेटकऱ्यांची पसंतीही मिळत आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंटही करत आहेत. बहुतेकांनी हे वेडेपण वाटत असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी याला अजब खेळ म्हटलं आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ एक हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.