JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : उंदरांचा त्रास कायमचा संपवण्यासाठी तरुणानं लढवली अजब शक्कल

Viral Video : उंदरांचा त्रास कायमचा संपवण्यासाठी तरुणानं लढवली अजब शक्कल

त्याचा या जुगाडानं काम तर केलं, पण त्याचा हा जुगाड नक्की काय आहे हे पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 18 जानेवारी : उंदीर घरात घुसणे ही खूप मोठी समस्या आहे. कारण ते एकदा का आपल्या घरी घुसले की मग ते आपल्या मागून आणखी चार जणांना घेऊन येतात आणि त्यांची ये जा सतत सुरु असते. उंदीर सगळी घाण करतात ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम तर होतोच शिवाय उंदीर घरातील सगळ्या गोष्टी खाऊ लागतात, ज्यामुळे नुकसान देखील भरपूर होतं. त्यामुळे एकदा का उंदीर घरात शिरले की मग लोकांची तारांबळ उडते आणि लोक उंदराला बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधू लागतात. मग काय तर पिंजरा आणि किंवा मग ग्लू पॅड लाव असं काहीतरी लोक करु लागतात. हे ही पाहा : Viral Video : किंग कोब्राशी खेळ म्हणजे मृत्यूला आमंत्रण, तरुणाने सापाची शेपटी पकडली आणि… पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो एका जुगाडाचा आहे असंच म्हणावं लागेल. कारण या व्हिडीओमध्ये ट्रिक वापरुन या व्यक्तीने आपल्या घरातील उंदरांना पळता भूई थोडी केलं आहे. त्याचा या जुगाडानं काम तर केलं, पण त्याचा हा जुगाड नक्की काय आहे हे पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. घरातील उंदरांना हाकलण्यासाठी या व्यक्तीने बाजारातून एक साप आणला आणि उंदरांच्या बिळात सोडला, मग काय उंदीर आपला जीव धरुन पळू लागले आणि हळूहळू या बिळातून बाहेर पळू लागले. पुढे या व्यक्तीने बिळाच्या बाहेर एक मोठी बादली ठेवली आणि एक एक करुन उंदीर त्यात उडी मारु लागले. ही ट्रीक पाहून तुम्हाला नवल नक्कीच वाटेल.

संबंधित बातम्या

ही ट्रीक तशी धोकादायक आहे कारण उंदरांसाठी सोडलेला साप माणसांच्या जीवावर देखील उठू शकतो. पण त्या व्यतीरिक्त मात्र त्याने लावलेल्या या जुगाडाचं कौतुक करताना लोक थकत नाहीत.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @weirdterrifying नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 7.5 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या