JOIN US
मराठी बातम्या / Viral / शेजारी चित्ता तरीही बेधडकपणे गवत खात होतं हरिण, Video पाहून व्हाल थक्क

शेजारी चित्ता तरीही बेधडकपणे गवत खात होतं हरिण, Video पाहून व्हाल थक्क

जंगलात एकापेक्षा एक शिकारी प्राणी असतात. वाघ, सिंह, चित्ता, अशा भयानक प्राण्यांपासून इतरही प्राणी घाबरतात. विविध प्राण्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालताना दिसतात.

जाहिरात

शेजारी चित्ता तरीही बेधडकपणे गवत खात होतं हरिण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 जुलै: जंगलात एकापेक्षा एक शिकारी प्राणी असतात. वाघ, सिंह, चित्ता, अशा भयानक प्राण्यांपासून इतरही प्राणी घाबरतात. विविध प्राण्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालताना दिसतात. एवढंच नव्हे तर लोक प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी जंगल सफारीवर जाण्याचं धाडसही करतात. प्राण्यांचे निरनिराळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये चित्ता आणि हरिण यांची झलक पहायला मिळतेय. चित्ता आणि हरणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हरिण एकदम निर्भिडपणे चित्त्याच्या समोर चरत आहे. चित्ता समोरुन हरणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र हरिण निवांतपणे चरतय. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक हरिण आरामात गवत खात आहे. तोच दुसरीकडून चित्ता दबक्या पावलात हरणाची शिकार करण्यासाठी येत आहे. मात्र दोघांच्या मध्ये कुंपन असल्यामुळे चित्ता हरणाची शिकार करु शकत नाही. त्यामुळे हरिणही चित्त्याला न घाबरता एकदम बिनधास्तपणे खात आहे. हा व्हिडीओ चर्चेत आला असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

संबंधित बातम्या

@susantananda3 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 37 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आला असून व्हिडीओवर अनेक कमेंट पहायला मिळत आहे. यापूर्वीही प्राण्यांचे असे अनेक मजेशीर व्हिडीओ समोर आले आहेत. कधी तर भयानक हल्ल्याचे दृश्यही समोर येतात जे पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या