JOIN US
मराठी बातम्या / Viral / सुनेनं सासऱ्याला रस्त्यावर पळवत लोखंडी रॉडने मारलं, बघ्यांची गर्दी पण.., संतापजनक Video

सुनेनं सासऱ्याला रस्त्यावर पळवत लोखंडी रॉडने मारलं, बघ्यांची गर्दी पण.., संतापजनक Video

अचानक वृद्ध व्यक्ती तिथून पळून जाऊ लागतो. हे पाहताच महिला रस्त्यावरच त्याचा पाठलाग करू लागते. व्हिडिओच्या शेवटी जखमी व्यक्ती खुर्चीवर बसलेला पाहायला मिळतो

जाहिरात

सुनेची सासऱ्याला मारहाण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 07 जुलै : जवळपास प्रत्येक कुटुंबात लहान-मोठे वाद होतच असतात. काही वाद काही काळानंतर मिटतात तर काही वाद इतके टोकाला पोहोचतात की त्याचा भलताच परिणाम पाहायला मिळतो. वाद मोठ्या मुद्द्यावरून किंवा छोट्या मुद्द्यावरून सुरू होते. पण कधीकधी परिस्थिती खूप वाईट होते आणि भांडण वेगळ्याच थराला जाऊन पोहोचतं. घरगुती हिंसाचाराच्या अनेक बातम्या वेळोवेळी येत असतात. अनेकदा अशा घटना समोर येतात, जेव्हा सासरचे लोक स्त्रियांशी गैरवर्तन करतात किंवा अशी प्रकरणं समोर येतात ज्यात स्त्रिया त्यांच्या सासरच्या लोकांशी गैरवर्तन करतात. Shocking! लाइव्ह रिपोर्टिंगवेळी श्वानाने रिपोर्टरला फरफटत नेलं; पाहा LIVE VIDEO सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक महिला आपल्या सासऱ्यावर हिंसक हल्ला करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हिरवी सलवार घातलेली एक महिला हातात लोखंडी पाईप घेऊन उभा असलेली दिसत आहे. तिच्या हावभावावरून असं जाणवतं की, ती महिला एका वृद्ध पुरुषावर ओरडत आहे तर दुसरी स्त्री आणि एक पुरुष तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही वेळाने संतापलेली महिला पुढे सरकते, तर दुसरी महिला त्या वृद्धाला वाचवण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, संतापलेल्या महिलेनं वृद्धाला पाईपने मारण्याचा प्रयत्न केला. पण, दुसरी महिला मधेच उभा राहून वृद्धाला वाचवते.

संबंधित बातम्या

अचानक वृद्ध व्यक्ती तिथून पळून जाऊ लागतो. हे पाहताच महिला रस्त्यावरच त्याचा पाठलाग करू लागते. व्हिडिओमध्ये ही घटना दुसऱ्या अँगलनेही दाखवण्यात आली आहे. व्हिडिओच्या शेवटी जखमी व्यक्ती खुर्चीवर बसलेला पाहायला मिळतो. Shonee Kapoor ने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. वापरकर्त्याने दावा केल्यानुसार, ही घटना हरियाणामध्ये घडली आहे. पुढे असाही दावा करण्यात आला आहे की, महिलेनं सासऱ्याचा पाठलाग करून त्याला लोखंडी पाईपने मारहाण केली आणि या हल्ल्यात तो जखमी झाला. असं सांगण्यात येत आहे, की वृद्धाला वाचवण्यासाठी आलेल्या मोलकरीणीलाही (दुसऱ्या महिलेला) महिलेने बेदम मारहाण केली. महिलेने वृद्धाच्या खिशातून 40 हजार रुपये काढले आणि याबाबत वृद्धाने विचारणा केली असता महिलेने त्याच्यावर हल्ला केला. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या