खतरनाक किंग कोब्रा घरात घुसला
नवी दिल्ली, 17 जून : आजकाल घरात साप, नाग, अजगर, किंग कोब्रा निघण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. कधी शूजमधून, टॉयलेमधून, फॅन, किचन, अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे भयानक प्राणी निघत आत आहेत. उन्हाळ्यात ते थंड ठिकाण शोधण्यासाठी बाहेर पडतात ज्यामुळे ते या सीझनमध्ये जास्त प्रमाणात दिसतात. घरामध्ये किंग कोब्रा आढळल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. यावेळी भलामोठा किंग कोब्रा घरामध्ये आढळून आला त्याला पाहून वन अधिकारीही चाट पडले. घरामध्ये एक महाकाय किंग कोब्रा घुसला होता, ज्याला काढण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवावे लागले आणि विशेष म्हणजे तो काढताना त्यांचाही घाम सुटला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन लोक साप पकडण्याच्या काठीने किंग कोब्राला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण कोब्रा बाहेर पडण्याचे नाव घेत नाही. दोन व्यक्ती खूप जोर लावून त्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तो खूप मोठा असल्यामुळे त्याला बाहेर ढकलणंही अवघड जात होतं. शेवटी वन अधिकारी त्याला मागून हाताने उचलून बाहेर काढतो.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, किंग कोब्रा जास्त लांबीचा आहे. हा व्हिडीओ अल्मोडा येथील चौमु गावचा आहे, जिथे 16 फूट लांब किंग कोब्राने दहशत निर्माण केली होती. दहशत घालणारा हा कोब्रा चक्क 16 फूटांचा होता. हा व्हिडीओ @Singh99_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट येताना दिसत आहेत. दरम्यान, दिवसेंदिवस असे प्राणी निघण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. ज्यामुळे लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.