पुराच्या पाण्यात डान्स
नवी दिल्ली 08 जुलै : सोशल मीडियाचा परिणाम लोकांवर इतका झाला आहे की, इथे कमी वेळात अधिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार होतात. कंटेंट क्रिएशनच्या नावाखाली लोक अनेकदा इतरांची गैरसोय करताना किंवा स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात लोक पुरामुळे त्रस्त दिसत आहेत, रस्त्यावर पुरामुळे गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र तिथेच काही मुली पुराच्या पाण्यात रील बनवण्यासाठी नाचताना दिसत आहेत. @trollpokhara नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, जो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक डोंगराळ भाग दिसत आहे, जिथे पूर आलेला आहे. जेव्हा डोंगरावर पाऊस पडतो तेव्हा त्याच्या पायथ्याशी असणाऱ्या रस्त्यावर पुरामुळे परिस्थिती बिकट होते. वरच्या भागातून पाणी खाली येतं. अशा परिस्थितीत भूस्खलनाचा धोकाही वाढतो. या परिस्थितीत लोकांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल किती काळजी वाटत असते. पण व्हिडिओमधील काही मुली सुरक्षिततेपेक्षा आणि काळजीपेक्षा रील बनवण्याबद्दल जास्त उत्सुक आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डोंगरावरून धबधब्यासारखं पाणी रस्त्यावर पडत आहे, त्यामुळे संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. दोन्ही बाजूला लोक उभे आहेत आणि बरेच लोक कार आणि बाइक घेऊन इथे थांबलेले दिसत आहेत. तर तिथेच जेसीबी मशिन रस्त्यावरील दगड हटवताना दिसत आहे. या सगळ्यामध्ये दोन मुली पाण्याच्या मधोमध नाचू लागतात आणि एक मुलगी त्यांच्यासमोर उभी राहून त्यांचा व्हिडिओ बनवते. तिथे उपस्थित लोक हे सगळं बघतच राहिले. समुद्रात बोटिंगचा आनंद घेत होता व्यक्ती; अचानक टायगर शार्कचा हल्ला, घटनेचा Live Video या व्हिडिओला 23 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलं की - “मला वाटत होतं की दोन्ही मुली घसरून पडतील.” दुसऱ्याने म्हटलं, असं दिसतं की जणू काही लोक त्यांना लाईव्ह पाहण्यासाठीच तिथे जमले आहेत. आणखी एकाने लिहिलं, की काही वेळात पाणी त्यांना आपल्यासोबत घेऊन जाईल. एकाने म्हटलं, देवाने त्यांना थोडा मेंदू द्यावा.