व्हायरल
मुंबई : सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. येथे कधीकधी काही मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतात. तर काही व्हिडीओ हे खूपच थरारक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून काही सेकंदासाठी तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. हा व्हिडीओ एका अपघाताचा आहे, पण नशीबाने या व्हिडीओत कोणाला काहीही झाले नाही, पण एका चिमुकल्याचा जीव मात्र थोडक्यात बचावला आहे. जर या चिमुकल्याचे वडिल तेथे हजर नसते, तर या बाळाचं काय झालं असतं, हे वेगळं सांगायला नको. वर्दळीच्या ठिकाणी तरुणांचा लग्जरी कारसोबत स्टंट आणि… पाहा Viral Video प्रत्येक व्यक्तीसाठी, त्याचे वडील एखाद्या सुपरहिरोसारखे असतात, असेच या चिमुकल्याचे वडिल देखील त्याच्यासाठी धावून आले, ज्यामुळे त्याचे प्राण वाचले. @DoctorAjayita ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो अतिशय धक्कादायक आहे. या व्हिडीओमध्ये एक वडिल सुपरहिरोसारखे आपल्या मुलासाठी धावून आले आणि त्यांनी प्राण वाचवले. रस्त्यावर अपघात कधीही होऊ शकतो, त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण जेव्हा लोक हे करत नाहीत तेव्हा समस्या निर्माण होतात. सर्वाधिक समस्या वेगवान वाहनांमुळे निर्माण होतात. लोक वेग हा एक छंद आणि मौजमजेची गोष्ट मानतात, पण त्यामुळे लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते.
या व्हिडीओमध्ये देखील असंच काहीसं होता होता राहिलं आहे. एक कार चालक जेव्हा भरधाव वेगाने कार घेऊन आला तेव्हा त्याला तिथे उभी असलेली बाईक दिसली नाही. त्या बाईकवर एक चिमुकला बसला होता. कार अतिवेगाने आपल्या जवळ येतेय, हे पाहाताच वडिलांनी क्षणाचा विलंब न करता आपल्या मुलाला उचललं, ज्यानंतर कारने त्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे, ज्यावर लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.