संतोष कुमार गुप्ता (छपरा), 06 एप्रिल : बिहारच्या छपरा जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वारंवार वाढ होताना दिसत आहे. सायबर क्राईम करून स्थानिकांना आपल्या जाळ्यात ओढून फसवत असल्याच दिसून आले आहे. लोकांना अडकवण्यासाठी इंटरनेटच्या दुनियेत वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहेत. छपरा जिल्ह्यातील सोनपूरमध्ये सायबर फसवणुकीची नवीन प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. कल्याणपूरमध्ये दोघांच्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने 1 लाख 48 हजार 970 रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
सायबर फसवणुकीमुळे येथील नागरिकांमध्ये विशेषत: बँक खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. कल्याणपूर पंचायतीचे अध्यक्ष दिनेश कुमार राय यांच्या पंजाब नॅशनल बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने एक लाख 10 रुपयांची फसवणूक केली.
3 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट, लग्नानंतर अंजली गावी आली आणि….तर दुसरीकडे मीना बाजार येथील शिव शंकर सिंह यांचा मुलगा राकेश कुमार याच्या बँकेच्या क्रेडिट कार्डवरून लिंक पाठवून गुंडांनी 48 हजार 960 रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये सोनपूर पोलीस ठाण्यात आणि हरिहरनाथ ओपी येथे दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पंचायत समिती अध्यक्ष म्हणाले की, पंजाब नॅशनल बँक सोनपूरमध्ये माझे खाते आहे. या खात्यातून 99 हजार 999 रुपयांसह 1 लाख 10 रुपये बेकायदेशीरपणे काढले आहेत. फसवणूक झाल्यानंतर त्यांनी बँक मॅनेजरची भेट घेऊन घटनेची माहिती दिली आणि सायबर क्राईम विभागाला याबाबत माहिती दिली. पोलीस एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
तर दुसरी घटना सोनपूर मीना बाजार येथील शिव शंकर सिंह यांचा मुलगा राकेश कुमार सिंग याच्यासोबत घडली. याबाबत, खातेदाराने हरिहरनाथ ओपीमध्ये दुसरी एफआयआर दाखल केली आहे. यापूर्वी त्याच्या नंबरवर एक फोन आला होता.
आदिवासीला मारण्यापूर्वी केळी आणि ज्यूस दिलं, म्हणून कोर्टाने दिला महत्वाचा निर्णययानंतर गुंडांनी व्हॉट्सअॅप नंबरवर लिंक पाठवली. लिंक ओपन करताच त्यांच्या क्रेडिट कार्डमधून 48 हजार 960 रुपये गायब झाले. यापूर्वी सोनपूर येथील एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या खात्यातून आठ लाख काढण्यात आले होते, त्याचा तपास अद्याप सुरू आहे.