JOIN US
मराठी बातम्या / Viral / पैसे नाही तर 'या' गोष्टीसाठी 93 वर्षीय महिला करतेय पार्टनरला डेट, कारण आश्चर्यचकीत करणारं

पैसे नाही तर 'या' गोष्टीसाठी 93 वर्षीय महिला करतेय पार्टनरला डेट, कारण आश्चर्यचकीत करणारं

एक 93 वर्षीय महिला एका मुलाला डेट करतेय. पण यामागचं खरं कारण मात्र आश्चर्यचकीत करणारं आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : असं म्हणतात की लहान मुलं आणि म्हातारी माणसं यांच्यात फारसा फरक नसतो. माणसं वृद्ध होऊ लागली की त्याच्यातील लहान मुल पुन्हा बाहेर येऊ लागतं आणि ते लहांनासारखे वागू लागतात. जे पाहून आपल्याला आश्चर्य वाटू शकतं, पण त्यांच्यासाठी यासगळ्याचा आनंद घेणं महत्वाच असतं. एक असंच प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये एक 93 वर्षीय महिला एका मुलाला डेट करतेय. पण यामागचं खरं कारण मात्र थक्क करणारं असतं. प्रेम केव्हाही होऊ शकतं, त्याला योग्य वय नसतं. पण प्रेम एखाद्या कारणासाठी केलं जात असेल तर ते थोडसं आश्चर्यकारक नक्कीच असू शकतं. असंच हे प्रकरण देखील आहे. ज्याचा व्हिडीओ या वृद्ध महिलेनं स्वत: शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये ही महिला एका डेटसाठी तयार होत आहे आणि ती तिच्या पार्टनरला भेटायला खूपच उत्सुक आहे. ही महिला सांगते की तिचा पार्टनर खूपच सुंदर आहे. त्याच्यासाठी डेटवर जायला ती तयार होत आहे. पुढे ही महिला आपले केस विंचरते आणि मग लिपस्टीक लावते, तेव्हा ती आवर्जुन सांगते की, कदाचित तिने तिच्या पार्टनरला किस केलं तर… म्हणून ही लिपस्टीक गरजेची आहे. तिच्या बोलण्यावरुन ती पार्टनरला किस करण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसते. लग्नाचा मंडप क्षणात झाला कुस्तीचं मैदान, नववधू-नवरदेवाच्या मारामारीचा Video Viral पुढे ही महिला उठून आपला ड्रेल व्हिडीओत दाखवते. ती मस्त आनंदी दिसत आहे. पुढे ती म्हणते की बस हा ड्रेस माझ्या पार्टनरला आवडू दे, पण लगेच तिच्या मनात विचार येतो आणि ती सांगते की जरी त्याला नाही आवडला तरी काहीच फरक पडत नाही, कारण ती फक्त खाण्यासाठी डेटवर जात आहे, ज्यामुळे ती तिची बॅग किंवा पैसे देखील घेऊन जाणार नाही.

संबंधित बातम्या

हे ऐकून नेटकऱ्यांना देखील धक्का बसला आहे. ही महिला एवढा सगळा घाट घालते, ते फक्त आणि फक्त खाण्यासाठीच. तिचं हे बोलणं अगदी लहान मुलांसारखं निरागस वाटत आहे. हा व्हिडीओ तिने स्वत: सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यावर लोकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या महिलेनं व्हिडीओत हे देखील सांगितलं की ती 25 वर्षांनंतर पहिल्यांदा डेटवर जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या