JOIN US
मराठी बातम्या / Viral / 35वं वरीस धोक्याचं! वयाची पस्तीशी गाठताच नरक होतं आयुष्य; कारण आहे एक 'शाप'

35वं वरीस धोक्याचं! वयाची पस्तीशी गाठताच नरक होतं आयुष्य; कारण आहे एक 'शाप'

इथं वयाची पस्तीशी गाठताच सर्वांनाच येतं टेन्शन.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो - Canva

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 05 जुलै : सोळावं वरीस धोक्याचं असं म्हटलं जातं. गाणंही तुम्ही ऐकलं असेल. तारुण्याच्या उंबरठ्यावरील हे वय. पण कधी वयाच्या पस्तीशीबाबत असं ऐकलं आहे का? पण एक असं ठिकाण जिथं 35 वं वयही धोक्याचं मानलं जातं. वयाची पस्तीशी गाठल्यावर अनेकांना टेन्शन येतं. कारण हे वय म्हणजे एक शाप मानलं जातं. या वयात येताच, आयुष्य नरकासारखं होतं. आता या 35 व्या वयात असं काय होतं ते पाहुयात. सामान्यपणे 35 वय मध्यम वयोगट. म्हणजे जो ना तरुण, ना म्हातारा. यांच्या मधोमध असलेलं क्रियाशील असं वय. हे वय म्हणजे नोकरी, करिअर, यश, प्रगती करण्याच्या मार्गावर असतो. तरुणपणाच्या सुरुवातीला केलेल्या कष्ट, मेहनतीचं फळ, तिशीनंतर 34-35 वयात मिळू लागतं. त्यामुळे हे वय तसं चांगलं मानलं जातं. पण असं ठिकाण जिथल्या लोकांसाठी मात्र वयाचा हा टप्पा बिलकुल चांगला नाही. या वयातील लोकांचं आयुष्य नरक बनतं. याला कर्स ऑफ 35 म्हणजे 35 वर्षांच्या वयाचा शाप म्हणतात. त्यामुळे वयाची पस्तीशी गाठताच इथल्या लोकांनाटेन्शन येतं.

आता पस्तीव्या वयातील शाप काय तर नोकरी जाणं. सामान्यपणे निवृत्तीचं वय हे 60 वर्षे असतं. पण चीनमध्ये नोकरीसाठी वयोमर्यादा ही 35 वर्षे आहे. अनेक कंपन्यांनी नोकरी देण्याच्या वयाची मर्यादा 35  ठेवली आहे. इथं 35  वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक 60 वर्षांचे मानले जातात. त्यामुळे 35  हे वयनिवृत्तीसारखं असतं. Viral News - पाळीव श्वानाचं सतत मालकिणीच्या ब्रेस्टवरच लक्ष; सत्य समजताच महिला हादरली =न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, चीनमध्ये वयाच्या आधारावर भेदभाव करणं बेकायदेशीर नाही. म्हातारपणी जास्त पैसे मोजावे लागतात तेव्हा त्यांना स्वस्तात काम करता यावं म्हणून येथे तरुणांना नोकरी दिली जाते. अशा स्थितीत वयाची 35 वर्षे पूर्ण झाल्यावर नोकरी जाण्याची भीती त्यांना सतावू लागते. आता परिस्थिती अशी आहे की सामाजिक आणि वैयक्तिकरित्या हे लोक वृद्ध झाल्यावर तणावाखाली येतात. चीनमध्ये मुले होण्याबाबतची लोकांची विचारसरणीही बदलली आहे कारण त्यांना ते परवडण्यासारखे वाटत नाही. सोशल मीडियावरही लोक या भीतीबद्दल बरेच काही बोलतात. 35वं वय धोक्याचं! वयाची पस्तीशी गाठताच नरक होतं आयुष्य; कारण आहे एक ‘शाप’ चिनी सोशल मीडियावर एका युझरने लिहिलं की, तो 35 व्या वर्षी कामासाठी खूप म्हातारा आहे. लोकांना घर खरेदी, लग्न, कुटुंब असे निर्णय घेण्यात लोकांना खूप अडचणी येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या