JOIN US
मराठी बातम्या / Viral / तलावाच्या काठावर फिरत होती महिला; अचानक मगरीने हल्ला करत जबड्यात पकडलं अन्..थरकाप उडवणारा VIDEO

तलावाच्या काठावर फिरत होती महिला; अचानक मगरीने हल्ला करत जबड्यात पकडलं अन्..थरकाप उडवणारा VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ग्लोरिया तिच्या कुत्र्याला किनाऱ्यावर घेऊन जाताच मगरीने मागून हल्ला केला. काही कळण्याच्या आतच मगरीने त्यांना आपल्या जबड्यात पकडलं आणि पाण्यात खेचून नेलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 24 फेब्रुवारी : मगर हा सर्वात भयानक प्राणी मानला जातो. तो पाण्यात असेल तर जंगलाचा राजा सिंहही आत जायला घाबरतो. कारण, मगर एवढ्या वेगाने हल्ला करते की ती पळून जाण्याची संधीच देत नाही. अशीच एक घटना नुकतीच अमेरिकेत घडली. एक महिला तिच्या कुत्र्याला तलावावर फिरायला घेऊन गेली होती. ती तलावाच्या काठावर फिरत होती, तेव्हा मगरीने अचानक हल्ला केला. मगरीने क्षणात या महिलेचा जी घेतला आणि तिला खेचून पाण्यात नेलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Viral Video : बिकिनीमध्ये उन्हाचा आनंद घेत होती महिला, अचानक साप आला आणि… द सनच्या रिपोर्टनुसार, 85 वर्षीय ग्लोरिया सार्ज फ्लोरिडामध्ये राहत होत्या. नेहमीप्रमाणे ती तिच्या कुत्र्याला तलावाच्या किनाऱ्यावर घेऊन गेली. तलावाच्या काठाचा आनंदही घेता येईल आणि कुत्राही फेरफटका मारेल, असं त्यांना वाटलं. मात्र, तलावाच्या काठावर एक महाकाय प्राणी घात करून बसला आहे याची त्यांना कल्पना नव्हती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ग्लोरिया तिच्या कुत्र्याला किनाऱ्यावर घेऊन जाताच मगरीने मागून हल्ला केला. काही कळण्याच्या आतच मगरीने त्यांना आपल्या जबड्यात पकडलं आणि पाण्यात खेचून नेलं.

संबंधित बातम्या

थोड्याच अंतरावर ग्लोरियाची शेजारी कॅरोल थॉमस होती. हे पाहून तिने आरडाओरडा केला. महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. रेस्क्यू टीम आणि पोलिसांना फोन केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. काही मिनिटांतच मगरीने तिला नष्ट केलं आणि संपूर्ण तलाव रक्ताने माखला. हे पाहिल्यानंतर पाहिल्यानंतर कॅरोल इतकी घाबरली की तिला कोणाला काही सांगताही आलं नाही. त्यांनी सांगितलं की मगर खूप विशाल आहे. तिने काही मिनिटातच त्या महिलेला आत ओढलं. आम्हाला तिला वाचवण्याची संधी मिळाली नाही. आम्ही बचावासाठी प्रयत्न केला मात्र मगरीने त्यांना आत खेचलं. या घटनेमुळे शेजाऱ्यांनाही मोठा धक्का बसला. श्वानाला वाचवण्यासाठी तरुणाने घेतली रेल्वे ट्रॅकवर उडी; इतक्यात अचानक ट्रेन आली अन्…पाहा VIDEO यापूर्वी ‘आउटडोर्ज़ डार्क साइड’ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यात एका मुलाची वाढदिवसाची पार्टी सुरू असताना काचेच्या पिंजऱ्यात मगर असल्याचे दिसते. तेव्हाच तिची केअरटेकर तिला खायला देते, पण मगर त्याच महिलेवर हल्ला करते. व्हिडिओमध्ये, महिला स्मित हास्य करत मगरीच्या तोंडाला स्पर्श करताना दिसते, पण अचानक मगर तिचा हात पकडते. यानंतर मगर तिला जोरात खेचू लागते. मगरीच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी ही महिला पाण्यात उडी मारते. मात्र तरीही मगर तिला सोडत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या