JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video Viral : मगरीच्या जबड्यात पाय ठेवून करत होता स्टंट; व्यक्तीसोबत भयानक घडलं

Video Viral : मगरीच्या जबड्यात पाय ठेवून करत होता स्टंट; व्यक्तीसोबत भयानक घडलं

एका माणसाने धोकादायक शिकारीच्या तोंडात पाय टाकला. मात्र तो पाय मागे घेण्यापूर्वीच मगरीने तो जबड्यात पकडला.

जाहिरात

मगरीचा व्यक्तीवर जीवघेणा हल्ला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 जून : प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वाधिक पसंत केले जातात. ज्यामध्ये तुम्हाला अनेकदा प्राण्यांची मस्ती आणि खोडकरपणा पाहायला मिळतो. परंतु कधीकधी त्यांच्याबरोबरची मजा-मस्ती जीवघेणी ठरू शकते. ते धोकादायक असल्याची जाणीव असूनही अनेक लोक त्यांच्यासोबत असे स्टंट करायला लागतात जे जीवघेणे ठरतात. वन्य प्राण्यांचा काहीही भरवसा नाही. त्यांचा मूड कधी बदलेल आणि जीव धोक्यात येईल हे सांगता येत नाही. Shocking Video: धावत्या कारच्या छतावर Push-Ups आणि जीवघेणा स्टंट, तरुणासोबत काय घडलं पाहा इंस्टाग्राम अकाऊंट snoopdogg शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, एका धोकादायक मगरीसोबत स्टंट करणं एका व्यक्तीला महागात पडल्याचं पाहायला मिळतं. धाडसाच्या नावाखाली एका माणसाने धोकादायक शिकारीच्या तोंडात पाय टाकला. मात्र तो पाय मागे घेण्यापूर्वीच मगरीने तो जबड्यात पकडला. खरं तर त्या भयंकर प्राण्यासोबत असं करून तो आपली ताकद आणि धाडस दाखवण्याचा प्रयत्न करत होता, पण दुसऱ्याच क्षणी त्या प्राण्याने त्याला पकडलं आणि मोठा धडा शिकवला.

संबंधित बातम्या

या व्यक्तीचा मगरीसोबतचा स्टंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, मात्र हा स्टंट पूर्ण होण्याऐवजी फसला. एका छोट्या तलावात मगरीसोबत स्टंट करताना या माणसाने प्राण्याचं तोंड घट्ट धरलं आणि प्रचंड गर्दीत स्टंटच्या नावाखाली प्राण्याच्या तोंडात पाय टाकायला सुरुवात केली. यावेळी त्या व्यक्तीने मगरीचं तोंड घट्ट पकडून ठेवलं असलं तरी, त्या व्यक्तीचा पाय मगरीसमोर येताच मगरीने लगेचच तो जबड्यात पकडला. त्यानंतर गोंधळ झाला आणि स्टंट टीमचे सर्व सदस्य आपल्या जोडीदाराला वाचवण्यासाठी धावले. स्टंटच्या नावाखाली धोकादायक प्राण्यांसोबत असे व्हिडिओ बनवणारे अनेकदा बघायला मिळतात, जे योग्य नाही. असं करणं म्हणजे स्वतःच्या जीवाला मोठा धोका तर असतोच, शिवाय प्राण्यांसोबत गैरवर्तनही होतं. इतकंच नाही तर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहताही येत नाही. मानवाने बनवलेले बंधन त्यांना शांततेने जगणे देखील कठीण करते. लोकांमधील कौतुक आणि सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज आणि लाईक्ससाठी त्यांच्याशी गैरवर्तन केलं जातं. बहुतेक वापरकर्त्यांनी अशा स्टंट आणि प्राण्यांसोबतच्या व्हिडिओंवर जोरदार टीका केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या