नवी दिल्ली 16 मे : मगर हा असा प्राणी आहे, जो आपल्या भक्ष्याला अत्यंत निर्दयीपणे मारतो. मगरीला ‘पाण्यातील राक्षस’ असंही म्हणतात. आपल्या आसपास एखादा जीव येताच मगर काहीच क्षणात त्याला आपली शिकार बनवते. फक्त प्राणीच नाही तर मानवालाही मगर काहीच क्षणात गिळून घेते. सोशल मीडियावर तुम्ही आजवर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यात मगरीने माणसावर हल्ला (Crocodile Attack on Man) करून जीव घेतला आहे. भर बाजारात महिला वकिलाला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण; लोक फक्त बघत राहिले, संतापजनक VIDEO सध्या सोशल मीडियावर एका मगरीचा असाच एक व्हिडिओ (Crocodile Attack Video) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती मगरीला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. यादरम्यान, या भयानक प्राण्याने जे काही केलं ते पाहून हा वृद्ध व्यक्तीही चांगलाच घाबरला. मगरीने या व्यक्तीला अशाप्रकारे धडा शिकवला की आता तो आयुष्यभर मगरीला हात लावण्याचा विचारही करणार नाही. मगरीने त्या व्यक्तीवर अतिशय भयंकर हल्ला केला.
हा 36 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वृद्ध व्यक्ती नदीच्या काठावर असलेल्या मगरीला पकडण्यासाठी सर्वात आधी तिच्या तोंडावर कापड टाकतो. यानंतर मगरीला त्याच्या दोन पायांच्यामध्ये ठेवून पकडण्याचा प्रयत्न करतो. आपण मगरीला सहज पकडू असं वृद्धाला वाटलं. मात्र मगरीमध्ये किती शक्ती आहे याची कदाचित त्यांना कल्पना नव्हती. मस्ती करणं तरुणीला भोवलं; चवताळलेल्या सापाने अचानक केला हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वृद्ध व्यक्तीने मगरीला हात लावताच मगरीने त्या व्यक्तीवर हल्ला केला. हे दृश्य खूप भीतीदायक आहे. मगरीने जर एखाद्या व्यक्तीला एकदा आपल्या जबड्यात घेतलं, तर ती त्या व्यक्तीचा जीव घेऊनच शांत होते. मात्र, हा व्यक्ती नशीबवान होता की तो मगरीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यात यशस्वी ठरला. जमिनीवर पडल्यानंतर तो मगरीला लाथ मारताना दिसतो. त्याने तसं केलं नसतं तर मगरीने त्याला आपली शिकार बनवलं असतं.