गाईने केलं मालकाचं सांत्वन
नवी दिल्ली 13 जून : मानव आणि प्राणी यांच्यातील नातं खूप खास असतं. या नात्यामुळे सकारात्मक भावनांना चालना मिळते, परंतु यासोबतच हे नातं त्यांच्यात एक मजबूत बंध देखील निर्माण करतं. सोशल मीडियावर मानव आणि प्राण्यांचे अनेक व्हिडीओ आहेत, जे तुम्हाला त्यांच्यातील नातं दाखवतात. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये प्राणी आणि त्यांचं त्यांच्या मालकाशी असलेलं नाते दर्शवलं आहे. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्ही खूप भावूक व्हाल. हा व्हिडिओ शेतकरी आणि एका गायीचं बॉन्डिंग दाखवतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक शेतकरी गुडघ्यावर डोकं ठेवून जमिनीवर बसला आहे. असं दिसतं की, शेतकरी खूप दुःखी आहे. दरम्यान, दोन श्वान त्याच्याकडे जातात आणि त्याला खूश करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्या शेतकऱ्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या मिशनमध्ये अपयश आल्यावर कुत्रे भुंकत त्याच्यापासून दूर जातात. काही वेळाने एकामागून एक अनेक गायी त्याच्याकडे येऊ लागल्या. गायींपैकी एक गाय ताबडतोब शेतकऱ्यावर आपले डोके घासते आणि त्याला मिठी मारू लागते.
तरीही त्या माणसाने प्रतिसाद न दिल्याने आणखी दोन गायीही त्याच्याजवळ सरकल्या आणि जवळ उभ्या राहिल्या, तर पहिली त्या व्यक्तीच्या डोक्याला स्पर्श करत राहिली, जणू ती त्याचं सांत्वन करत आहे. श्वान आणि गायींनी त्यांच्या मालकाला दुःखी पाहिलं आणि ते त्याच्या जवळ उभे राहिले. यावरून हे सिद्ध होतं की प्राण्यांना भाषा नसते, परंतु ते त्यांच्या मालकाचं दुःख समजू शकतात आणि ते त्यांना आधार देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात. भर जंगलात पर्यटकांच्या गाडीसमोर येऊन थांबला चित्ता, पुढे घडलं असं की…पाहा धक्कादायक Video हकन कपुकुने कॅप्शनसह व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “प्राणी जाणूनबुजून मानवांना आनंदित करण्यात मदत करू शकतात याचा पुरावा. हा शेतकरी दुःखी आहे. प्रथम श्वान त्याला आनंद देण्याचा प्रयत्न करतात. ते करू शकत नाहीत तेव्हा ते गायींना हाक मारतात. दयाळूपणा सर्वोत्तम आहे.” मन जिंकणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.