गाईने तरुणाला घडवली अद्दल
नवी दिल्ली 25 जून : अतिशय शांत प्राण्यांमध्ये गाईचं नाव पहिलं येतं. गाईने एखाद्यावर आक्रमकपणे हल्ला केल्याचं फार क्वचितच पाहायला मिळतं. मात्र, जेव्हा या गायींना त्रास दिला जातो किंवा मारलं जातं, तेव्हा त्याही आक्रमक होतात आणि हल्ला करतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शांत उभा असलेल्या गाईला मारणं एका व्यक्तीला भलतंच महागात पडल्याचं दिसतं. त्या व्यक्तीला वाटलं की गाईला काहीही केलं तरी ती शांतच राहील. मात्र घडलं भलतंच. गाईने जे केलं ते पाहून आसपासचे लोकही हादरले. आरामात BMW कार बघत होता हा प्राणी; इतक्यात चित्त्याने झेप घेत मान पकडली अन्..शिकारीचा थरारक Video व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्तीला गायीला तिच्या जागेवरुन पुढे सरकवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गाई जागेवरुन सरकत नाही, यामुळे रागावून तो गाईला लाथ मारतो. पण तरीही गायीने त्याचं ऐकलं नाही तेव्हा त्या माणसाने तिची शेपटी पकडली आणि तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या व्यक्तीला वाटलं, की गायीची शेपटी धरून तो तिला नियंत्रित करू शकेल. पण गाईच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. जेव्हा हा व्यक्ती तिला वारंवार त्रास देत राहिला तेव्हा गाई चिडली आणि तिने जोरात या व्यक्तीच्या मागे धावायला सुरुवात केली.
भकडलेली गाई हल्ला करू लागताच तिथे उपस्थित सगळे घाबरले. गायीने आधी माणसाला जमिनीवर आपटलं. त्यानंतर शिंगांनी त्याच्यावर हल्ला केला. यादरम्यान ती व्यक्ती स्वत:ला वाचवतानाही दिसली. पण रागावलेली गाई त्याला इतक्या सहजासहजी कुठे सोडणार होती. जेव्हा तो व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा गायीनेही त्याला ओढलं आणि आपला संपूर्ण भार टाकून त्याच्या अंगावर चढली अन् त्याला तुडवलं. या घटनेदरम्यान आजूबाजूचे लोक आरडाओरड करताना दिसले. गायीचा राग पाहून त्या व्यक्तीला वाचवण्याचं धाडस कोणाचंच झालं नाही. @ExtremeFaiIs नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 13 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सनी गायीची कृती योग्य असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने म्हटलं की, ‘प्राण्यांसोबत कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करू नका.’ तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, ‘मला खूप आनंद झाला की या माणसासोबत हे घडलं’. आणखी एका युजरने म्हटलं की, ‘गायीने त्याला खरी जागा दाखवली.’