JOIN US
मराठी बातम्या / Viral / हनिमूनच्या रात्रीच पत्नीबद्दल असं काही समजलं की कोर्टात धाव, न्यायालयानेही दिली घटस्फोटाची परवानगी

हनिमूनच्या रात्रीच पत्नीबद्दल असं काही समजलं की कोर्टात धाव, न्यायालयानेही दिली घटस्फोटाची परवानगी

हनिमूनच्या रात्रीच पतीला पत्नीबद्दल असं काही समजलं की तो थेट कोर्टात गेला. यानंतर न्यायालयानेही त्याला घटस्फोटाची परवानगी दिली आहे

जाहिरात

पत्नीबद्दल ती गोष्टी समजताच पतीने कोर्टात धाव घेतली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 18 जून : तुम्ही अशी अनेक प्रकरणं पाहिली किंवा ऐकली असतील ज्यात पती-पत्नीच्या नात्यात आलेल्या कटुतेमुळे घटस्फोट झाला असेल. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की, पत्नी किन्नर असल्यामुळे पतीने घटस्फोट मागितला? असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथून समोर आला आहे. हनिमूनला तरुणाला कळालं की त्याची बायको पूर्णतः स्त्री नाही. यानंतर त्याने पत्नीवर उपचारही केले, पण काही साध्य झालं नाही. मग तरुणाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. ज्यावर निकाल देण्यात आला आहे या लग्न रद्द करण्यात आलं आहे. तरुणाचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या तरुणाचा 7 वर्षांपूर्वी 27 जानेवारी 2016 रोजी विवाह झाला होता. हनिमूनला त्याला कळालं की त्याने जिच्याशी लग्न केलं आहे, ती पूर्णपणे स्त्री नाहीच. तिचे प्रायव्हेट पार्ट अजिबात विकसित झालेले नव्हते. लग्नात डीजेवाले बाबूच्या प्रेमात पडली MA पास तरुणी, त्याच्यासोबत पळूनही गेली आणि आता… सुरुवातीला तरुण खूप अस्वस्थ झाला, त्यानंतर त्याने माहिती मिळवून डॉक्टरांशी संपर्क साधून पत्नीवर उपचार करून घेतले. अनेक महिने उपचार करूनही फायदा झाला नाही. यासोबतच डॉक्टरांनी तरुणाला सांगितलं होतं की, त्याची पत्नी कधीही आई होऊ शकणार नाही. बदनामीच्या भीतीमुळे त्याने सुरुवातीला कोणाला काही सांगितलं नाही, असं तरुणाचं म्हणणं आहे. काही काळाने वकील अरुण शर्मा तेहरिया यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. खटल्याची सुनावणी झाली. 7 वर्षे न्यायालयात खटला चालला आणि आता निकाल आला आहे. पुराव्याच्या आधारे कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे. न्यायालयाने विवाह रद्द ठरवला आणि घटस्फोटाचे आदेश दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या