JOIN US
मराठी बातम्या / Viral / नोव्हेंबर महिन्यात लग्न करण्यास घाबरतात लोक; कारण जाणून व्हाल हैराण

नोव्हेंबर महिन्यात लग्न करण्यास घाबरतात लोक; कारण जाणून व्हाल हैराण

नवीन कार्याची सुरुवात असो किंवा लग्नासारखा (Marriage) मोठा निर्णय, लोक योग्य वेळेची किंवा मुहूर्ताची काळजी घेतात. मात्र, झिम्बाब्वे (Zimbabwe) येथे लोक नोव्हेंबरमध्ये लग्न करण्यास प्रचंड घाबरतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 11 सप्टेंबर : नशीब आणि दुर्भाग्य दोन्ही असे विषय आहेत जे दुर्लक्षित करणे सोपे नाही. नवीन कार्याची सुरुवात असो किंवा लग्नासारखा (Marriage) मोठा निर्णय, लोक योग्य वेळेची किंवा मुहूर्ताची काळजी घेतात. मात्र, झिम्बाब्वे (Zimbabwe) येथे लोक नोव्हेंबरमध्ये लग्न करण्यास प्रचंड घाबरतात. त्यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंरमध्ये लग्न (Marriage in November) केल्यास गरोदरपणाबाबतच्या (Pregnancy) अडचणी तसंच घटस्फोट (Divorce) यासारख्या समस्या येतात. झी न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. या प्रथेवर विश्वास ठेवणारे शोना कम्युनिटीचे लोक सहसा दक्षिण अफ्रीका आणि झिम्बाब्वे येथेच राहतात. इथे राहणाऱ्यांना काही लोकांचं असं म्हणणं आहे, की याच काळात इथे पाऊस होतो. त्यामुळे वनस्पती आणि इतर जीव या दोन्हींच्या विकासासाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. तर, काही लोकांचं असंही म्हणणं आहे, की हा महिना प्रथा आणि परंपरांसाठी अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे, या काळात कोणतेही गोंधळाचे असणारे कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. भरमंडपात नवरीने नवरदेवाला रडवलं; नेमकं काय घडलं पाहा VIDEO ईसाई समाजातील काही लोक या पवित्र महिन्यातील कार्यक्रमावरील बंदीच्या विरोधात आहेत. तर, परंपरा मानणारे लोक अजूनही या नियमांचं पालन करतात. taarifa.rw मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, सॅटरडे हेराल्ड लाईफस्टाईलच्या एका सर्व्हेक्षणात असं समोर आलं, की ब्लॅक नोव्हेंबरचा मुद्दा परंपरा आणि सांस्कृतिक मान्यतांसोबत जोडला गेला आहे. हे मानणं लोकांच्या स्वतःच्या इच्छेवर अवलंबून आहे. लग्नाच्या काळात बकरी आणि मेंढ्यांची मागणी वाढते. मात्र, हा महिना त्यांच्या प्रजननासाठी अनुकूल असतो. यामुळे समुदायातील काही लोक या महिन्यात लग्न न करण्याचा सल्ला देतात. अचानक GF घरी आल्यानं तरुणाने दुसरीला अर्धनग्न अवस्थेतच बाल्कनीत लटकवलं अन्… या गोष्टीवर विश्वास असणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे, की या गोष्टीवर विश्वास न ठेवल्यास भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एका महिलेनं सांगितलं, की मला आठवतं माझ्या भावाचं लग्न आठ वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात झालं होतं आणि त्याला अजूनही मुल-बाळ झालेलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या