JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video : फोटोच्या नादात कपलचा जीव धोक्यात, फोटोग्राफरच्या हुशारीमुळे वाचले दोघांचे प्राण

Video : फोटोच्या नादात कपलचा जीव धोक्यात, फोटोग्राफरच्या हुशारीमुळे वाचले दोघांचे प्राण

हल्लीच फोटो आणि सेल्फीच्या नादात अनेकांनी आपले प्राण गमवल्याचे तुम्ही ऐकले असेल किंवा पाहिले देखील असेल. सध्या समोर आलेला व्हिडीओ असाच काहीसा आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जुलै : पावसाळा सुरु झाला आहे. ज्यामुळे बहुतांश लोक धबधबा आणि निसर्गाचं सौंदर्य पाहायला जात आहेत. शिवाय काही मंडळी तर आपल्या लग्नाचे फोटो शुट करण्यासाठी देखील अशा ठिकाणी जात असतात. यामुळे फोटो सुंदर येताता आणि अशा ठिकाणी वेळ घालवणं देखील फार अविस्मरणीय असतं. पण कधी कधी निसर्ग असं काही रौद्र रुप दाखवतो की त्याची आपल्याला भीती वाटू लागते. हल्लीच फोटो आणि सेल्फीच्या नादात अनेकांनी आपले प्राण गमवल्याचे तुम्ही ऐकले असेल किंवा पाहिले देखील असेल. सध्या समोर आलेला व्हिडीओ असाच काहीसा आहे. परंतु यामध्ये कॅमेरा मॅनच्या दक्षतेमुळे कपलचे प्राण वाचले आहे. विसरलेल्या फोनचं लॉक स्क्रीन पाहताच सर्वांनाच बसला धक्का, नक्की त्यात असं काय होतं? इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये इंडोनेशियातील बाली येथील एंजल्स बिलाबोंगचे एक सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता, जिथे नद्या आणि धबधबे डोंगराच्या मधोमध वाहताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत टेकडीच्या एका बाजूला उभं राहून एक जोडपं फोटो काढण्यासाठी पोज देताना दिसतं, पण तेव्हाच फोटोग्राफरला कुठल्यातरी अनुचित घटनेचा संकेत मिळतो, ज्यामुळे तो जोडप्याला लगेचच मागे बोलावतो.

संबंधित बातम्या

तेवढ्यात पाण्याची एक उंच लाट येते आणि ती जोरदार येऊन आदळते जिथे आधी हे कपल उभे असते. कॅमेरा मॅनने आधीच या कपलला सावध केले नसते, तर कदाचित ते दोघेही तोल जाऊन उंचावरुन खाली पडले असते. इंस्टाग्रामवर आतापर्यंत या व्हिडिओला 12 लाख 40 हजार लाइक्स मिळाले असून लोक कमेंट करून फोटोग्राफरच्या समजूतीचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘कॅमेरा मॅनवर नेहमी विश्वास ठेवा.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या