JOIN US
मराठी बातम्या / Viral / उंच डोंगरावर झोका घेणं भोवलं; साखळी तुटली अन् थेट खोल दरीत कोसळलं जोडपं; थरारक घटनेचा Live Video

उंच डोंगरावर झोका घेणं भोवलं; साखळी तुटली अन् थेट खोल दरीत कोसळलं जोडपं; थरारक घटनेचा Live Video

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी डोंगरावरील उंच ठिकाणी असलेल्या एका पर्यटन स्थळावर हवेतून दरीपर्यंत झोका घेण्यासाठी स्विंग लावण्यात आलेला आहे. ज्यावर कोणत्याही सुरक्षेशिवाय लोकांना झुलवत थरार अनुभवायला लावला जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 14 मार्च : आपण सर्वांनी आपल्या लहानपणी असे अनेक चित्रपट पाहिले आहेत, ज्यामध्ये उंच डोंगरावर गाडी चालवताना ब्रेक फेल झाल्याने कार उंच शिखरावरून खाली पडते. उंच डोंगरावरुन खाली पडल्याने अनेकांचा मृत्यूही होतो. अशा परिस्थितीत आपण नेहमी उंचावर असलेल्या ठिकाणी सावधगिरी बाळगली पाहिजे. मात्र आजकाल अॅडव्हेंचर स्पोर्टच्या नावाखाली काही लोक असे कारनामे करतात, जे त्यांना चांगलेच महागात पडतात. रस्त्यावर हाय व्होलटेज ड्रामा; व्यक्तीने भलामोठा दगड उचलून दुचाकीस्वाराच्या डोक्यात घातला, धक्कादायक VIDEO नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसतं की पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी डोंगरावरील उंच ठिकाणी असलेल्या एका पर्यटन स्थळावर हवेतून दरीपर्यंत झोका घेण्यासाठी स्विंग लावण्यात आलेला आहे. ज्यावर कोणत्याही सुरक्षेशिवाय लोकांना झुलवत थरार अनुभवायला लावला जात आहे. मात्र, हा अनुभव तेव्हा चांगलाच महागात पडला, जेव्हा एका जोडप्याच्या वजनाने हा झुला तुटला आणि थेट खोल दरीत कोसळला.

संबंधित बातम्या

व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला असून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असे रोमांचक अनुभव घेण्याआधी कोणीही दहा वेळा विचार करेल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे. तर ट्विटरवर तो शॉकिंग व्हिडिओ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओ शेअर केल्यापासून अवघ्या एका दिवसात तो २ मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. त्याच वेळी, 35 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी तो लाईकही केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या असून नेटकरी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या