JOIN US
मराठी बातम्या / Viral / मुंगूसापेक्षाही भारी पडला कोंबडा! प्रतिकार करणं दूर सापाने भीतीनेच ठोकली धूम; पाहा VIDEO

मुंगूसापेक्षाही भारी पडला कोंबडा! प्रतिकार करणं दूर सापाने भीतीनेच ठोकली धूम; पाहा VIDEO

कोंबड्याने घेतला चक्क सापाशी पंगा.

जाहिरात

सापाला भिडला कोंबडा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑगस्ट : मुंगूस (Mongoose video) आणि साप (Snake video) आपल्या परिचयाचे असलेले एकमेकांचे कट्टर शत्रू. मुंगूस आणि सापाची लढाई (Mongoose snake video) आपल्यासाठी नवीन नाही. या दोघांमधील थरारक लढाईचे बरेच व्हिडीओ आपण पाहिले असतील (Mongoose snake fight video). या लढाईत कधी मुंगूस जिंकतो तर कधी साप. पण मुंगूसापेक्षाही सापाशी भारी टक्कर दिली आहे ती एका कोंबड्याने (Cock snake video). साप म्हटलं तरी आपल्याला घाम फुटतो. पण अशाच सापाशी चक्क भिडला तो एक कोंबडा (Cock snake fight video). ज्याने सापाला सरो की पळो करून सोडलं (Cock attack on snake video). सोशल मीडियावर (Social media) या सापाचा आणि कोंबड्याचा (Cock video) व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral video) होतो आहे.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता, कोंबड्याचं खुराडं आहे. तिथं वर एका बाजूला कोपऱ्यात एक साप शांत बसला आहे. एक व्यक्ती त्या सापाला तिथून हटवण्याचा प्रयत्न करते आहे. हातात एक दांडा घेऊन त्या सापाला हलवलं जात आहे. साप थोडी आपलं डोकंसुद्धा वर करतो. त्यानंतर तिथं एक कोंबडा येतो आणि तो सापावर तुटूनच पडतो. हे वाचा -  अरे बापरे! रस्त्यावर गाड्यांसमोर आला Anaconda आणि…; धडकी भरवणारा VIDEO साप आणि कोंबडा दोघंही वरून खाली जमिनीवर कोसळतात. जमिनीवर पडतात कोंबडा सापावर आपल्या चोचेने वार करत जातो. सापाला कोंबड्याला बोचकारत राहतो. कोंबडा सापाला इतकं मारतो की साप अक्षरशः घाबरतो. तो कोंबड्याला साधा प्रतिकारही करत नाही. तर फक्त आपला जीव वाचावा यासाठी तो तिथून धूम ठोकतो. हे वाचा -  भयंकर! मेल्यानंतर 20 मिनिटांनी नाग झाला जिवंत; शेफला दंश; वाचून अंगावर येईल काटा व्हायरल हॉग या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहे. कोंबड्याच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या